
रत्नागिरी : संवेदनशील हापूसची उन्हातून वाहतूक केल्यास फळामध्ये साका तयार होण्याची भीती असते. त्यामुळे फळ खराब होते आणि त्याचा फटका आंबा बागायतदाराला बसतो. हे टाळण्यासाठी दूरवर आंबा (Ratnagiri Hapus Mango) वाहून नेण्याच्या उद्देशाने ‘सिंधू-रत्न समृद्ध’ योजनेतून (Sindhuratna Samrudh Yojana) १ वातानूकुलित गाडी पणन मंडळाकडे उपलब्ध झाली आहे. त्याचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार आहे. त्याचे लोकार्पण आज (ता. १) पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.