esakal | नशीब बलवत्तर म्हणून वाचाला 'त्या' सातजणांचा जीव ; रत्नागिरीत घडली ही घटना
sakal

बोलून बातमी शोधा

the accident of boat but no mortality in ratnagiri

बारा पार करताना अपघात, सातवड्याचा नौकेला फटका, गणेशकृपा पाण्याबाहेर काढली , 11 लाख 6 हजारांचे नुकसान 

नशीब बलवत्तर म्हणून वाचाला 'त्या' सातजणांचा जीव ; रत्नागिरीत घडली ही घटना

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

गुहागर : मच्छीमारीसाठी गेलेल्या श्री गणेश कृपा या नौकेला लाटांच्या माऱ्याने गुहागर तालुक्‍यातील अंजनवेलजवळ समुद्रामध्ये बुडाली. ही घटना रविवारी (ता. 9) सकाळी 10.30च्या सुमारास घडली. नौकेवरील सहा खलाशी पोहत सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले. फळीआधारे समुद्रात पोहत असलेल्या दोघांना समुद्रातील इतर नौकांनी वाचवले. अपघातग्रस्त नौकेचे 11 लाख 6 हजार 230 रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर गणेशकृपा नौकेला मच्छीमारांनी समुद्राबाहेर काढले. 

हेही वाचा - लाॅकडाउनकाळात सामाजिक जागृती; शिक्षकाच्या कलेचे कौतुक...

गुहागर तालुक्‍यातील धोपावेमध्ये राहणारे नाखवा ज्ञानेश्वर भोरजी आपल्या मालकीची श्री गणेश कृपा नौका घेऊन रविवारी सकाळी 7.30 वाजता मच्छीमारीसाठी बाहेर पडले. त्यांच्यासोबत नौकेवर राजेश भोरजी (रा. धोपावे), रोहिदास भोरजी (रा. धोपावे), उदय दाभोळकर, जयदास भाटकर, तुकाराम पालशेतकर, जगन्नाथ पवार, प्रणित दाभोळकर (सर्व रा. दाभोळ) असे 7 खलाशी होते. दाभोळ खाडीतून अरबी समुद्रात शिरताना एका अरुंद धोकादायक पट्टयातून नौका घेऊन जावे लागते. मच्छीमारांच्या भाषेत याला बारा असे म्हणतात. हा बारा पार करत असताना अंजनवेल टाळकेश्वर मंदिराच्या डोंगराजवळ सातवड्याचा (सलग येणाऱ्या सात मोठ्या लाटा) फटका नौकेला बसला. या लाटांचे पाणी नौकेत शिरल्याने नौके बुडाली. नौका बुडताना नाखवासह 7 खलाशांनी गाठण्यासाठी पोहायला सुरवात केली. अन्य दोघे जण लाकडाच्या फळीचा आधार घेऊन समुद्रात पोहत होते. ही घटना घडली त्या वेळी गणेश कृपा नौकेच्या पुढे आणखी काही नौका मच्छीमारीसाठी बाहेर पडल्या होत्या. त्यापैकी डॉ. मोकल यांच्या मालकीच्या मच्छीमारी नौकेतील खलाशांनी गणेशकृपाला झालेला अपघात पाहिला. तातडीने ती नौका खलाशांच्या मदतीला धावली. मोकलाच्या नौकेतील खलाशांनी समुद्रातील दोन खलाशांना वाचविले. त्यामुळे गणेशकृपावरील नाखवासह 7 खलाशांचा जीव वाचला.

हेही वाचा -  चौकशी अहवालच सापडला वादात; जाणून घ्या नेमके प्रकरण... 

या दुर्घटनेनंतर अंजनेवल, वेलदूर आणि धोपावेतील मच्छीमार नौका बुडालेल्या ठिकाणी आले. सर्वांनी गणेशकृपा नौकेला पाण्यातून बाहेर काढले. अन्य नौकांच्या साह्याने अपघातग्रस्त नौका धोपावे येथील फेरीबोटीजवळील मच्छीमार जेटीवर आणण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी खलाशांची भेट घेतली. मत्स्य व्यवसाय विभागामार्फत दाभोळच्या परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. सदर पंचनामा मत्स्य व्यवसायाचे मुख्य कार्यालयाला तसेच गुहागर तहसीलदारांना पाठवून देण्यात येणार आहे. 

नुकसानभरपाईबाबत साशंकता 

समुद्रामध्ये वादळी वारे वाहत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा शासनाने दिला होता. त्यामुळे अपघातग्रस्त श्री गणेशकृपा नौकेला शासनाकडून भरपाई मिळण्याबाबत साशंकता आहे. 

संपादन - स्नेहल कदम

रत्नागिरी रत्नागिरीरत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीरत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी  रत्नागिरीरत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीरत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीरत्नागिरीरत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीनरत्नागिरी रत्नागिरीरत्नागिरी 

loading image