esakal | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; शिवशाहीची टेम्पोला धडक

बोलून बातमी शोधा

accident in kankavli sindhudurg shivshahi bus and alcohol tempo}

पुण्याहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसने उभ्या आयशर टेम्पोला मागून धडक दिली.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; शिवशाहीची टेम्पोला धडक
sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) : दारुवाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला शिवशाही बसने मागून धडक दिल्याने अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाक्याजवळ आज (मंगळवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.  

अपघातस्थळी फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. कुडाळच्या दिशेने जात असलेला आणि महाराष्ट्रीयन बनावटीची अधिकृत दारू वाहतूक करणारा आयशर टेम्पो ओसरगाव टोल नाक्याजवळ रस्त्याकडेला उभा होता. 

हेही वाचा - रत्नदुर्ग किल्ला परिसरात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ -

पुण्याहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसने उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला मागून धडक दिली. धडकेनंतर टेम्पोतील दारूच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर पसरले. फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा काचेचा खच रस्त्यावर पडला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल  झाले आहेत. पुढील तपास सुरु आहे. 

संपादन - स्नेहल कदम