मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; 12 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सावंतवाडी : इन्सुली क्षेत्रफळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर डंपर व टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. या अपघातात पुण्यातील भोसरी येथील 12 पर्यटक जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सावंतवाडी : इन्सुली क्षेत्रफळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर डंपर व टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. या अपघातात पुण्यातील भोसरी येथील 12 पर्यटक जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

वरद राज (२७), रवी मरुरकर (२९), रमेश गरड (२४), सागर भोसले (२७), सागर उघडे (२३), दीपक मोरये (२४), अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील काही जणांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. हा अपघात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यातील जखमींना येथील कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर दहा ते पंधरा मिनिटे जखमी व्यक्ती गाडीत पडून होते. अखेर काँग्रेसचे प्रांतिक सदस्य बाळा गावडे यांचा चालक आसिफ बेग यांनी माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या मदतीने जखमींना येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात येण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी दिला आहे.

Web Title: Accident on Mumbai Goa Highway 12 Peoples Injured