esakal | सिंधुदुर्गात अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार

कणकवली - समोरील वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. जानवली रतांबा वाहळ येथे झालेल्या या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाला आहे. प्रवीण विनायक खाड्ये (नांधवडे) आणि दयानंद सुतार (उंबर्डे) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. 

सिंधुदुर्गात अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - समोरील वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. जानवली रतांबा वाहळ येथे झालेल्या या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाला आहे. प्रवीण विनायक खाड्ये (नांधवडे) आणि दयानंद सुतार (उंबर्डे) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर जानवली रतांबा वाहळ येथे वाहनाला ओव्हरटेक करत असताना दोन दुचाकींची धडक झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. नांधवडे येथील प्रवीण विनायक खाडये आणि उंबर्डे येथील दयानंद सुतार या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नाधवडे येथील ज्येष्ठ नागरिक शेट्ये  हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

loading image
go to top