esakal | कोकण : मुंबईवरुन दापोलीकडे येणाऱ्या 'एसटी'ला अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण : मुंबईवरुन दापोलीकडे येणाऱ्या 'एसटी'ला अपघात

पहाटेच्या पावसाळी व 'धुक्या'च्या वातावरणात समोरील खड्डे व खोदकाम दिसून येत नसल्याने असे अपघात घडत आहेत.

कोकण : मुंबईवरुन दापोलीकडे येणाऱ्या 'एसटी'ला अपघात

sakal_logo
By
सचिन माळी.

मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ परिसरात रोहिदासवाडी जवळ खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्यात परळ दापोली एसटी पलटल्याची घटना आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईकडून दापोलीकडे ही गाडी येत होती. गाडीत २३ प्रवासी होते. त्यातील घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चार प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्यांना प्रथमोपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा: नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही?- राज ठाकरे

घटनास्थळी पंचनामा सुरू असून गाडी बाहेर काढण्याचा काम सुरू आहे. म्हाप्रळ ते शेनाळे दरम्यान या महामार्गावर खड्डे पडले असून प्राधिकरणाने अनेक ठिकाणी रस्ता खोदल्याने यापूर्वीही अपघात घडले आहेत. पहाटेच्या पावसाळी व 'धुक्या'च्या वातावरणात खड्डे व खोदकाम दिसत नसल्याने अपघात घडत आहेत. या परिसरात सर्रास अपघात होतात असे येथून प्रवास करणारे चालक सांगत आहेत. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची डागडुजी व बॅरिकेट्स लावले नसल्याने अपघात घडत असून संबंधित विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

loading image
go to top