esakal | रत्नागिरीत अपघाताचे प्रमाण घटले; पंधरा वर्षांत यंदा सर्वांत कमी अपघात 
sakal

बोलून बातमी शोधा

Accident rate decreased in Ratnagiri

कोकण रेल्वेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळ काहीशी रोडावली. मात्र मागील काही वर्षांपासून रस्त्यांवरील वाहतुकीने पुन्हा गर्दी केली आहे

रत्नागिरीत अपघाताचे प्रमाण घटले; पंधरा वर्षांत यंदा सर्वांत कमी अपघात 

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - जिल्ह्यात यावर्षी रस्ते अपघातामध्ये चांगलीच घट झाली आहे. लॉकडाउनमध्ये झालेली जिल्हाबंदी हे याचे प्रमुख कारण आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत मार्गांवर नऊ महिन्यात 222 अपघात झाले. त्यामध्ये 69 गंभीर अपघातांमध्ये 76 जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या पंधरा वर्षांमधील सर्वांत कमी अपघातांची नोंद यंदा झाली आहे.

कोकण रेल्वेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळ काहीशी रोडावली. मात्र मागील काही वर्षांपासून रस्त्यांवरील वाहतुकीने पुन्हा गर्दी केली आहे. कोकणात येणार्‍या तसेच गोव्याकडे जाणार्‍या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले होते. मुंबई-गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात होता; मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाउन सुरू झाले. सहा महिने जिल्हाबंदी असल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. त्यामुळे एकूण अपघातात मोठी घट झाली आहे. महिन्याला मृतांची संख्या 50 च्या आसपास असते; मात्र लॉकडाउन काळात ही संख्या 10च्या खाली आली आहे तर एप्रिल महिन्यात रस्ते अपघातात एकाचाही मृत्यू झालेला नाही.

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 222 अपघात झाले. त्यापैकी 69 अपघातात 76 जणांचा बळी गेला. जानेवारी माहिन्यात 11,  फेब्रुवारी 14, मार्च 7, एप्रिल 0, मे 7, जून 10, जुलै 8, ऑगस्ट 10, सप्टेंबर 9 असा मृतांचा समावेश आहे. 73 अपघातात 158 जण गंभीर जखमी झाले तर 51 अपघातात 136 जण किरकोळ जखमी झाले असून, 29 अपघातात केवळ वाहनांचे नुकसान झाले. जिल्ह्यात लॉकडाउन काळापासून रस्ते अपघातात मोठी घट झाली आहे. आता वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काही प्रमाणात अपघातांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचामाझ्यावर जी कारवाई करायची असेल ती करावी ; खासदार सुनिल तटकरे

अपघाताची स्थिती

महिना        अपघात       मयत
जानेवारी       10           11
फेब्रुवारी       13           14
मार्च           06           07
एप्रिल         00           00
मे              06           07
जून            09           10
जुलै           06            08
ऑगस्ट       10            10
सप्टेंबर       09             10

एकूण        69                76

संपादन - धनाजी सुर्वे