
पिंपरी खुर्द (ता. चिपळूण) येथील विशाल रघुनाथ कडव यांचे रविवारी सायंकाळी मध्यप्रदेशमधील सागर शहरात अपघाती निधन झाले.
मध्यप्रदेशातील अपघातात चिपळूणातील 'या जवानाला' गमवावे लागले प्राण....
चिपळूण (रत्नागिरी) : पिंपरी खुर्द (ता. चिपळूण) येथील विशाल रघुनाथ कडव यांचे रविवारी सायंकाळी मध्यप्रदेशमधील सागर शहरात अपघाती निधन झाले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर पिंपरी खुर्द येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा- फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा...
विशाल आणि त्याचा साथीदार श्रीकांत दोघे मध्यप्रदेशातील ढाणा येथे दुचाकीने गेले होते. परत येत असताना त्यांच्या दुकाचीला डंबर चालकाने उडविले. दोघांच्या डोक्यात हेल्मेट होता. मात्र डंपरची दुचाकीला जोरात धडक बसली. त्यात हे दोघे लांब फेकले गेले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. दोघांना मकरोनिया या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारा दरम्यान विशालचे निधन झाले.
हेही वाचा- धक्कादायक : रत्नागिरीत सातशे रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या..
13 वर्षे केली देशाची सेवा.
विशाल त्यांच्या मृत्यूची बातमी रात्री खेर्डी येथील त्यांच्या मित्राला कळविण्यात आली. त्यांचे वडील रघुनाथ कडव हे माजी सैनिक असून ते आजारी असल्याने महिनाभरापूर्वीच विशाल आपल्या वडिलांना भेटून गेले होते. पत्नी आणि आणि चार वर्षाचा मुलगा शिव यांच्यासह ते आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी राहत होते.विशालचे बारावीपर्यंत शिक्षण हे चिंचघरी येथील हायस्कूलमध्ये झाल्यानंतर ते 15 मराठा बटालियनमध्ये दाखल झाले. गेली 13 वर्षे ते देशसेवेत होते. 9 वर्षं जम्मू काश्मीरमध्ये काढल्यानंतर आता ते भोपाळमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्यात आई, वडील, तीन बहिणीसह पत्नी, मुलगा असा परिवार आहे.