वाढदिवशी झालेल्या भेटीतूनच झाला घात..! कुठे घडली घटना ?

रविंद्र साळवी
Wednesday, 26 August 2020

लांजा येथील महिलेच्या विरूद्ध लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांजा : मुंबई लॉकडाऊन कालावधीत गावी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधमाला आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लांजा येथील महिलेच्या विरूद्ध लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - मृत बिबट्याला जमिनीत पुरून त्याची तीन नखे ठेवली लपवून ; तिघे जण ताब्यात...

लांजा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पन्हळे येथील लांजा शहरामध्ये राहणारी पिडीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या संबधित नातेवाईकांतील महिलेची मुलगी या वर्ग मैत्रीणी होत्या. त्या मुलीचा १७ अॉगस्ट २०१९ रोजी  वाढदिवस होता. अल्पवयीन पिडीत मुलगी ही या वाढदिवसाला गेली होती. त्यावेळी आरोपी सुर्यकांत विश्राम कानडे ( वय - ५८ ) हे देखील हजर होते . त्यावेळी  त्या महिलेच्या मुलीने पिडीत मुलीला हे माझे वडील असल्याची ओळख करुन दिली होती. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ही कामासाठी मुंबई येथे गेली असता आरोपी सुर्यकांत कानडे याला याची माहिती मिळाली. आरोपीने त्या मुलीकडून पिडीत मुलीचा मोबाईल नंबर घेतला. त्याने पिडीत मुलीला फोन करुन त्याने घरी भायखळा येथे  जेवणाचे आमंत्रण दिले. त्यानुसार पिडीत मुलगी सुर्यकांतच्या घरी गेली असता आरोपीने तीच्यावर बलात्कार केला आणि कुठे वाचता केलीस तर मान आवळून टाकेन अशी धमकी दिली. 
            
आरोपी सुर्यकांत याने पिडीत मुलगी मुंबई येथे असताना वारंवार बलात्कार केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन मध्ये सदर पिडीत मुलीली मार्च महिन्यात लांजा येथे त्या महिलेच्या घरी आणून ठेवण्यात आले होते. त्यावेळी  या पिडीत मुलीला हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घालून वावरण्यास सांगितले.

हेही वाचा - तब्बल चार महिन्यानंतर धावली शिवशाही...

मार्च ते मे महिन्यामध्ये सुर्यकांत कानडे हा वारंवार गावी आल्यानंतर पिडीत मुलीवर बलात्कार करत होता. यामूळे शारिरीक संबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर सोमवारी रात्री आपली फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलीस सुर्यकांत कानडे आणि त्याला मदत करणारी महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय चौधरी, पोलीस नाईक दिनेश आखाडे, काँन्टेबल सुनील पडळकर हे करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused raped a minor girl in lanja ratnagiri