
महाराष्ट्र शासनाने एलईडीद्वारे मासेमारीवर कायद्याने बंदी घेतली आहे. तरीही खोल समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी सुरू असल्याचा दावा पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.
मिऱ्या येथे 'या' संशयामुळे मासेमारी नाैकेवर कारवाई
रत्नागिरी - एलईडीद्वारे मासेमारीस महाराष्ट्रात कायद्याने बंदी आहे. मात्र, तरी राजरोस एलईडीचा वापर करून मासेमारी केली जात असावी, असा संशय निर्माण करणारी कारवाई मत्स्य खात्याने केली. मिऱ्या येथे एका मासेमारी नौकेवरून सहाय्यक मत्स्य विभागाने जनरेटर जप्त केला आहे. या संदर्भातील खटला आता तहसीलदारांकडे चालणार आहे.
हेही वाचा - कॉंग्रेसमध्ये येथे पुन्हा एकदा नियुक्ती वाद
बुधवारी ( ता. 8) झालेल्या या कारवाईमुळे संबंधित नौका कारवाई करून स्थानबद्ध ठेवली आहे. यामुळे पारंपरिक आणि पर्ससिन यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याच्या शक्यतेने या बोटींवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने एलईडीद्वारे मासेमारीवर कायद्याने बंदी घेतली आहे. तरीही खोल समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी सुरू असल्याचा दावा पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.
हेही वाचा - राजापूर तालुक्यातील या धरणग्रस्तांना अखेर मोबदला
कारवाईबाबत काहीशी गुप्तता
बुधवारी (ता. 8) मिऱ्यावर अशा प्रकारे एक नौका लागल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाली. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव आणि परवाना अधिकारी यांनी नौकेवर जाऊन जनरेटर जप्त केले. त्यावर मासे किंवा लाईट सापडले नसल्याचे पालव यांनी सांगितले. याबाबत संबंधित नौका मालकावर तहसीलदारांकडे खटला दाखल केला आहे. मात्र, कारवाईबाबत काहीशी गुप्तता बाळगण्यात आली आहे. एलईडी मासेमारीला उघडपणे विरोध केला जात आहे.
हेही वाचा - प्राणी संग्रहालय, सर्प उद्यान येथे होणार
मत्स्य विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज
काही ठिकाणी मासेमारी राजरोस सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते, असा आरोप पारंपरिक मच्छीमार करत आहेत. मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने हा व्यवसाय आतबट्ट्यात आहे. एलईडीद्वारे सोप्या पद्धतीने मासेमारीवर अधिक भर दिला जात असून ते थांबविण्यासाठी मत्स्य विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
हेही वाचा - प्राणी संग्रहालय, सर्प उद्यान येथे होणार
Web Title: Action Fishing Boat Mirya Beach Ratnagiri Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..