राजापूर तालुक्यातील 'या' धरणग्रस्तांना अखेर मोबदला  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Juwathi Dam Victims Gets Compesation Ratnagiri Marathi News

शासनाच्या जलसंधारण विभागातर्फे 2004 मध्ये जुवाठी येथे धरण बांधून पूर्ण करण्यात आले. सुमारे 160 हेक्‍टर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाची 2 हजार 234 टीएमसी एवढी पाणीसाठ्याची क्षमता आहे.

राजापूर तालुक्यातील 'या' धरणग्रस्तांना अखेर मोबदला 

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील जुवाठी येथील लघुपाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या धरणाच्या डाव्या कालव्यासाठी जागा गेलेल्या शेतकऱ्यांची मोबदल्याची प्रतीक्षा आता संपली आहे. डाव्या कालव्यासाठी भूसंपादन केलेल्या 341 शेतकऱ्यांना सुमारे 1 कोटी 3 लाख 31 हजार 733 रुपयांचे वितरण प्रांत कार्यालयातर्फे सुरू झाले आहे. याच प्रकल्पातील उजव्या कालव्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदल्याचे प्रांत कार्यालयातर्फे वाटप केले जाणार आहे. 

शासनाच्या जलसंधारण विभागातर्फे 2004 मध्ये जुवाठी येथे धरण बांधून पूर्ण करण्यात आले. सुमारे 160 हेक्‍टर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाची 2 हजार 234 टीएमसी एवढी पाणीसाठ्याची क्षमता आहे. या धरणाला उजवीकडे दीड कि.मी., तर डावीकडे सुमारे 4.15 कि. मी. चा कालवा आहे.

हेही वाचा - कॉंग्रेसमध्ये येथे पुन्हा एकदा नियुक्ती वाद 

मोबदल्याचे लवकरच वितरण

या धरणासाठी काढण्यात आलेल्या डाव्या कालव्यासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मोबदल्याचे वितरण सुरू झाले आहे. त्यामध्ये 341 शेतकऱ्यांना 1 कोटी 3 लाख 31 हजार 733 रुपयांचे वितरण सुरू झाले आहे. या धरणाच्या उजव्या कालव्यासाठी 476 शेतकऱ्यांच्या जागा संपादित करण्यात आल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात आला नसून लवकरच त्याचे वितरण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

धरणातील रेग्युलेटर बदलणार 

चिपळूण येथील तिवरे धरणाच्या झालेल्या दुर्घटनेनंतर कोकणामध्ये बांधण्यात आलेल्या धरण प्रकल्पातील रेग्युलेटर बदलण्याचे आदेश शासनाने जलसंधारण विभागाला दिले आहेत. त्यानुसार जुवाठी धरणातील रेग्युलेटर बदलण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रेग्युलेटर बदलण्यासाठी सुमारे 1 कोटी खर्च अपेक्षित असून हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. 

हेही वाचा - लांजा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान 

दृष्टिक्षेपात... 

  • 2004 मध्ये धरण पूर्ण 
  • डाव्या कालव्यासाठी जमीन देणाऱ्यांना मोबदला 
  • उजव्या कालव्यासाठीचाही मोबदला लवकरच 
  • 2 हजार 234 टीएमसी क्षमता 
     

Web Title: Juwathi Dam Victims Gets Compesation Ratnagiri Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..