दारुची चोरट्या पद्धतीने वाहतूक; इन्सुली पथकाने केली मोठी कारवाई

कारवाई
कारवाई
Updated on
Summary

या कारवाईत एकूण आठ लाख वीस हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बांदा (सिंधुदुर्ग): गोव्यातून सोलापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची स्कॉर्पिओ मोटारीतून चोरट्या पद्धतीने वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाके पथकाने ओटवणे (जि. सिंधुदुर्ग) येथे तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत एकूण आठ लाख वीस हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी समाधान शिवाजी चौरे (वय 27) व समाधान मारुती चव्हाण (वय 28) दोघेही रा. पेनूर, ता. मोहोळ जि. सोलापूर यांना अटक करण्यात आली. ही कारवाई काल सायंकाळी उशिरा करण्यात आली.

कारवाई
बांदा ते दोडामार्ग होणार 'औद्योगिक कॉरिडॉर'; राणेंचा निर्णय

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क खात्याने बांदा-दाणोली मार्गावर ओटवणे येथे तात्पुरते तपासणी नाके उभारले आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या पथकाला गोव्याहून सोलापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ओटवणे तपासणी नाक्यावर इन्सुलि व सातारा जिल्ह्यातील भरारी पथकाने सापळा रचला होता.

कारवाई
परप्रांतीय कामगाराचा खून; संशयिताच्या मुसक्या आवळण्यास बांदा पोलिसांना यश

बांद्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ मोटारीला (एमएच ०४ जीएम ८०६७) तपासणीसाठी थांबवण्यात आले. त्यावेळी मोटारीच्या मागील डिकीत व सीटवर गोवा बनावटीच्या दारूचे विविध ब्रँडचे ३५ बेकायदा खोके आढळले. पथकाने तीन लाख 20 हजार 804 रुपयांचा किमतीच्या दारूसह पाच लाख रुपये किंमतीची मोटार व इतर मुद्देमाल असा एकूण आठ लाख वीस हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाई
बांदा-गडगेवाडीत परप्रांतीय कामगाराचा खून

ही कारवाई उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुलि तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक एस. एस. काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एल. राणे, रमेश चंदुरे जवान संदीप कदम यांच्या पथकाने केली. या कारवाईसाठी सातारा जिल्ह्यातील भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक एन. पी. क्षिरसागर व त्यांच्या कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. काळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
Marathi News Esakal
www.esakal.com