esakal | कोकण मोहीम; ग्रामस्थांना शिस्त लागण्यासाठी खेर्डीत दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Action taken against those walk without mask covid 19 kokan marathi news

गेल्या महिन्यापासून राज्यभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत

कोकण मोहीम; ग्रामस्थांना शिस्त लागण्यासाठी खेर्डीत दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी)  : गेल्या काही दिवसांपासून चिपळूण तालुक्‍यासह जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तरुण, ग्रामस्थ व महिला मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी संचार करीत आहेत. त्यामुळे खेर्डी परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतीने खबरदारी घेतली आहे. खेर्डी ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्य करणाऱ्या व संचार करणाऱ्यांनी मास्कचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. कारवाईची ही मोहीम सोमवारपासून (ता. 22) ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येणार आहे. 


गेल्या महिन्यापासून राज्यभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. कोरोनाच्या सुरवातीस खेर्डीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यावर विविध उपाययोजना राबवून वाढता संसर्ग रोखण्यात आला होता; मात्र काही दिवसांपासून कोरोनाचा नागरिकांना विसर पडला आहे. 

हेही वाचा- मानेवर फावड्याचा जोराचा फटका बसताच तो खाडीपात्रात कोसळला अन् गावात एकच खळबळ

संचार करण्यावर बंधने येणार? 
मास्कचा वापर न करता, सोशल डिस्टन्स न पाळता बहुतेकजण बिनधास्तपणे वावरत आहेत. रुग्ण वाढल्यास प्रशासनाकडून संचार करण्यावर बंधने येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना शिस्त लागण्यासाठी शासकीय नियमानुसार विना मास्क फिरणाऱ्यांवर खेर्डी ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे कारवाई होण्यापूर्वीच खेर्डीत वास्तव्य करणाऱ्या व बाहेरून येणाऱ्या लोकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले.  

संपादन- अर्चना बनगे