विरोधात काम करणाऱ्यांचा समाचार योग्यवेळी घेणार - अनंत गीते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

खेड - रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत काहीजण संघटनेत राहून संघटनेच्या विरोधात काम करत आहेत. त्यांचा समाचार योग्यवेळी घेतला जाईलच, परंतु कोकणातील शिवसैनिक इतका निष्ठावंत आहे की अशा घरच्या भेदींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास खासदार अनंत गीते यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी खेड येथे विजयी मेळावा झाला. मेळाव्यात उत्तर रत्नागिरीतील सर्व विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.  कोकणात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसह मुंबई  महानगरपालिकेत मतदारांनी शिवसेनेलाच स्वीकारले आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, असे अनंत गीते यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा या निकालाने स्पष्ट झाले आहे. विरोधकांना चारी मुंड्या चीत करत शिवसेनेने जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेतली आहे. कोकणासह मुंबईतही शिवसेनेची सत्ता आली आहे. सध्याचे वातावरण शिवसेनेला पोषक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उत्तर रत्नागिरीतून विजयी झालेले सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: action will provide those who work against