Raigad News : महिलांनी अनावश्यक रूढी मध्ये अडकून न रहाता पुरोगामी विचार स्वीकारावे - संजना पाटील

महाराष्ट्र अंनिसचा विधवा प्रथा व अनिष्ट रूढी निर्मूलन समाज सन्मान सोहळा संपन्न
actress sanjana patil says women should not stuck in tradition go with trend of india with following tradition
actress sanjana patil says women should not stuck in tradition go with trend of india with following tradition sakal

पाली : "महिलांनी आपला आत्मसन्मान जपावा. अनावश्यक रूढी मध्ये अडकून न रहाता पुरोगामी विचार स्वीकारावे" असे विचार सुप्रसिद्ध अभिनेत्री संजना पाटील यांनी रविवारी (ता.17) बोर्लीपंचतन श्रीवर्धन येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड यांच्या वतीने विधवा प्रथा व अनिष्ट रूढी निर्मूलन समाज सन्मान सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

श्रीवर्धन तालुक्यातील विधवा प्रथा व अनिष्ट रुढींच्या निर्मूलनासाठी पर्यायाने महिला सन्मानासाठी भरीव कार्य करणाऱ्या संस्था, समाज मंडळे व या पुरोगामी निर्णयांचा अवलंब करत पुढाकार घेणाऱ्या, संत व समाज सुधारकांच्या वाटेने एक पाऊल टाकणाऱ्या,

समाजाला दिशादर्शक व्यक्तींचा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती रायगड जिल्हा तर्फे विशेष सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळयास प्रमुख उपस्थिती अभिनेत्री बसंजना पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष,

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती होते. या वेळी मंचावर सरपंच ज्योती परकर, लिलाधर खोत, शरद पाटील, मानसी जाधव, रणजित मुरकर, सेजल पेडणेकर, प्रांजल पडवेकर, वसुधा खोत, विजय परब उपस्थित होते.

महिलांचा सन्मान व प्रतिष्ठा जपण्याकरीता विविध प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धांच्या जोखडातून मुक्त करायला हवे. या करीता जात, समाज मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळाने पुढाकार घेतला तर क्रांतिकारक बदल होऊ शकतो.

यांचा वस्तुपाठ श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे, दिवेआगार या गावांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यात विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या ग्राम पंचायत मुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे या गावांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी खुजारे ग्राम पंचायत सरपंच निला पवार व महिला मंडळ अध्यक्ष संगीता काते दिवेआगर माळी समाज, श्रीवर्धन माळी समाज, वेळास भंडारी समाज, गणेश पेठ महिला मंडळ यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच विधवा प्रथा बंदी साठी प्रबोधन व कृती करीता प्रातिनिधिक सत्कार ग्रामविकास अधिकारी खुजारे शंकर मयेकर, अजिता दवटे श्रीवर्धन, परकर गुरुजी परिवार बोर्ली यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महा. अंनिस महिला विभाग राज्य कार्यवाह आरती नाईक, खुजारे पोलीस पाटील दिलीप खेडेकर, दिलीप भुसाने, सुहास मार्कंडे, सरपंच ज्योती परकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र अंनिस रायगड कार्याध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन सुप्रिया जेधे तसेच सुविधा गायकवाड यांनी केले. सूत्र संचालन महेंद्र ओव्हाळ व प्रियांका खेडेकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com