आदिवासी मुलाला लागला खंडयाचा लळा...

अमित गवळे
सोमवार, 23 जुलै 2018

पाली - आदिवासी बांधव म्हणजे रानाची पाखरे असतात. या रानाच्या पाखरांच्या लहानग्यांना देखील निसर्ग आणि प्राणी व पक्षांचा खूप लळा असतो. असेच माणगाव तालुक्यातील साजे आदिवासी वाडीवरील एका सातवीत शिकणाऱ्या आदिवासी मुलाने चक्क खंडया म्हणजे धीवर (किंगफिशर) पक्षी सांभाळला आहे.

शनिवारी (ता.20) सकाळी 9 च्या सुमारास साजे आदिवासी वाडीवर रस्त्याच्या बाजूला काही मुले एका पक्षासोबत खेळतांना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता एका मुलाने हातात घेतलेल्या काठीवर खंडया पक्षी बसला होता. त्याच्या एका पायाला दोरी बांधली होती. या मुलाला विचारले हा पक्षी कुठून आणला ? त्याने सांगितले जंगलात भेटला. याचे नाव काय विचारल्यावर माहीत नाही असे सांगितले. खायला दिले का? काय खातो? तर म्हणाला खायला दिले. मासे खातो तो., या पक्षाचे काय करणार आहेस? मी त्याला जंगलात सोडून देणार आहे असे त्या मुलाने सांगितले. आणि तो पक्षाला घेऊन गेला. तो पक्षी देखील त्याच्या सोबत निर्धास्त वाटत होता.

या आधी देखील येथील एका मुलीने गायबगळा पाळला होता. तो बगळा खूप माणसाळला होता. या संदर्भातील वृत्त सकाळने दिले होते.

अशा प्रकारे जंगली प्राणी किंवा पक्षी पाळणे योग्य नाही. जर का लहान पिल्लू अगर जखमी प्राणी किंवा पक्षी असेल तर त्याच्यावर योग्य उपचार करून निसर्गात सोडून दयावे. जाणून बुजून त्यांना पाळणे अयोग्य आहे. असे एका निसर्ग प्रेमीने सकाळला सांगितले.

Web Title: Adivasi children kept White-throated kingfisher bird