स्थानिकांना नोकरीत सामावून घ्या-  आमदार पाटील

अमित गवळे
मंगळवार, 3 जुलै 2018

सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायत हद्दी जिवा फुड कंपनी अाहे. कंपनी व्यवस्थापन लोकप्रतिनिधींचा सातत्याने अवमान करीत असून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत. यासह ग्रामस्थांच्या इतर तक्रारीवरुन पाली सुधागड तहसिल कार्यालयात आ. धैर्यशिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली.

पाली - सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायत हद्दी जिवा फुड कंपनी अाहे. कंपनी व्यवस्थापन लोकप्रतिनिधींचा सातत्याने अवमान करीत असून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत. यासह ग्रामस्थांच्या इतर तक्रारीवरुन पाली सुधागड तहसिल कार्यालयात आ. धैर्यशिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली.

कंपनी व्यवस्थापनाची सुरु असलेली मुजोरी व मनमानी खपवून घेणार नाही. कारखान्याला आमचा विरोध नाही, मात्र स्थानिक,भुमिपुत्र व सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत प्रथम प्राधान्य देवून प्रकल्पात सामावून घेणे हे सक्तीचे असेल असे पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. जिवा फुड कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान पसरत असलेली दुर्गंधी, परिसरात घोंगावणार्‍या माशा व दुषीत पाणी यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारीवर चर्चा करण्यात अाली. 

कंपनी व्यवस्थापन व स्थानिक लोकप्रतिनीधिंमध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. जनतेचे लोकप्रतिनिधीत्व करणार्‍या लोकप्रतिनीधींना कंपनी व्यवस्थापनाकडून मान सन्मान मिळणे अपेक्षित असल्याचे आ.पाटील म्हणाले. प्रदुषण मंडळ विभाग व आरोग्य विभागाने जिवा फुड कंपनीने उत्पादन प्रक्रीया सुरु करताना आवश्यक अटी, शर्ती व कागदपत्रांची पुर्तता केली आहे की नाही? याची तपासणी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस आ. धैर्यशिल पाटील, जि.प सदस्य सुरेश खैरे, प्रांताधिकारी रविंद्र बोंबले, पाली सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर, प्रदुषण महामंडळाचे अधिकारी एस.एल. वाघमारे, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.जे. मढवी, गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, नायब तहसिलदार वैशाली काकडे, जिवा फुड मशरुम कंपनी व्यवस्थापक राहूल शेडगे व निलेश साखरे, अॅड.सुभाष पाटील, अरिफ मनियार, खवली सरपंच रुचिता बेलोसे, उपसरपंच रेश्मा तळकर, खवली ग्रा.पं. स. नितीन मेणे आदींसह खवली व विडसई ग्रामस्त उपस्थीत होते.

Web Title: Adopt the local people in the job says MLA patil