

कोकणातील राजकारणात नव्या तणावाला सुरुवात झाली असून, दोन्ही नेत्यांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
esakal
Konkan Political News : महायुतीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, तो निर्णय मी घेत नाही. पक्षहिताचे जे असेल त्याबाबत नेते निर्णय देतील. सिंधुदुर्ग वा कोणताही पालकमंत्री असो तो म्हणजे सर्व नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी स्वबळाबाबत मत जाहीर करू नये. महायुतीबाबत पक्ष निर्णय देईल तेच होईल, अशी स्पष्ट भूमिका खासदार नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केली.