बाधीत शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरूच - आ. धैर्यशिल पाटील

अमित गवळे
सोमवार, 2 जुलै 2018

पाली (रायगड) : वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 (अ) दुहेरीकरण होत आहे. रुंदीकरणादरम्यान होत असलेल्या भूसंपादनात होणार्‍या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा ही शेतकर्‍यांची मागणी रास्त आहे. जोपर्यंत बाधीत शेतकर्‍यांचे प्रश्न व समस्यांचे निराकरण होउन शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलनात्मक लढा सुरुच राहिल असा इशारा शेकाप आमदार धैर्यशिल पाटील यांनी दिला आहे. 

पाली (रायगड) : वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 (अ) दुहेरीकरण होत आहे. रुंदीकरणादरम्यान होत असलेल्या भूसंपादनात होणार्‍या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा ही शेतकर्‍यांची मागणी रास्त आहे. जोपर्यंत बाधीत शेतकर्‍यांचे प्रश्न व समस्यांचे निराकरण होउन शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलनात्मक लढा सुरुच राहिल असा इशारा शेकाप आमदार धैर्यशिल पाटील यांनी दिला आहे. 

पाली तहसिलकार्यालयात शनिवारी (ता.30) आ. धैर्यशिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एम.एस.आर.डी.सी प्रशासन, बाधीत शेतकरी, महसुल प्रशासनाचे अधिकारी, तसेच भुमिअभिलेख विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्तिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पावसाळी अधिवेशात बाधीत शेतकर्‍यांच्या या प्रश्नावर आवाज उठविणार आहे असे धैर्यशिल पाटील यांनी सांगितले.  या बैठकीत शेतकर्‍यांना भेडसावणारे प्रश्न व समस्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. रुंदीकरणाला आमचा विरोध नाही पण शेतकर्‍यांचे समाधान देखील झाले पाहिजे. रुंदीकरणादरम्यान येणार्‍या तांत्रीक अडचणी समन्वयाने सोडविण्याच्या सुचना आ. पाटील यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी सर्वप्रथमता नवीन जी.आर. 2013 प्रमाणे 19 गावातील शेतकर्‍यांना सुधारीत दराप्रमाणे योग्य मोबदला देण्यात यावा या मागणीवर विशेष भर दिला.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी सांगितले की शेतकर्‍यांनी भुसंपादनात अतिरिक्त होत असलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे. त्या अनुशंगाने कॅपिटल 3 ए च्या प्रक्रीयेअंतर्गत येत्या 25 दिवसात संयुक्त मोजणी केली जाईल. तसेच रस्ता सुरक्षेसंदर्भात ठेकेदाराला आवश्यक सुचना दिल्या असून रस्ता सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. असे सांगितले.  

या बैठकीस आ. धैर्यशिल पाटील, जि.प सदस्य सुरेश खैरे, उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले (रोहा), पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर, नायब तहसिलदार वैशाली काकडे, एम.एस.आर.डी.सीचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, ऍड. सभाष म्हात्रे, सुधागड तालुका शेतकरी समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, आदींसह शेतकरी उपस्थीत होते.

Web Title: agitation continues till remuneration not collect by farmers said mla dhairyashil patil