
Dapoli Agriculture Department : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकृत ई-मेल आयडीचा वापर करून सायबर फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून १२ निवृत्त कर्मचाऱ्यांचे ११ लाख ९४ हजार ९३३ रुपये काढल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनोळखीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते ५ जून या कालावधीत घडली आहे.