esakal | कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बोलून बातमी शोधा

agriculture department employee attend a suicide in malvan sindhudurg}

दरम्यान अधिकच्या उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) : येथील तालुका कृषी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने कार्यालयातच आंबा किडीवर फवारणीचे औषध प्यायले असल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. त्याला तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान अधिकच्या उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज तालुका कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान कक्षात बसलेल्या एका कर्मचाऱ्याने आंबा किडीवर फवारणीचे औषध पिले. हा प्रकार लक्षात येताच शिपायाने याची माहिती बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र संपर्क होऊ न शकल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खासगी गाडीतून त्या कर्मचाऱ्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवलाय का ? -

वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कर्मचाऱ्याला तत्काळ अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले होते. कृषी विभागातील अन्य कर्मचारीही दाखल झाले होते. हा प्रकार नेमका कोणत्या कारणावरून घडला हे स्पष्ट झालेले नाही.