esakal | 'मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवलाय का ?'

बोलून बातमी शोधा

nilesh rane criticized on state government on resign of sanjay rathod in sindhudurg}

 मात्र तीन दिवस उलटल्यानंतरही राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचला नसल्याचं वृत्त समोर येत आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी पु्न्हा एकदा राज्य सरकारवरला धारेवर धरलं आहे. 

'मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवलाय का ?'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : गेले काही दिवसांपासून पुजा चव्हाण प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु आहे. याप्रकरणी ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले आहेत. विरोधकांच्या मागणीनंतर २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. मात्र तीन दिवसानंतरही राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचला नसल्याचं वृत्त समोर येत आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवरला धारेवर धरलं आहे. 

दरम्यान भाजपाचे निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटद्वारे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, २ दिवस झाले संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सुद्धा त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाही. त्यांचा राजीनामा घरी किंवा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवलाय काय ? २५ दिवस होत आले तरी FIR घेत नाही, राजीनामा मंजूर होत नाही, महाराष्ट्र हे विसरणार नाही. 


हेही वाचा - बाकी, कोकणचे सगळे ईशयच संपले की काय ..? निलेश राणेंनी मारला टोमणा -

या प्रकारामुळे राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वनमंत्री पदावर आहेत. दरम्यान पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचा राजीनामा या मुद्द्यांवरुन विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रविवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सपत्नीक भेट घेतली आणि राजीनामा सुपूर्द केला.