अरे वा : आता देवरुखात उडणार सुखोई, मिराज.... 

Air Sukhoi Mirage Fly In Devrukh Kokan Marathi News
Air Sukhoi Mirage Fly In Devrukh Kokan Marathi News

साडवली (रत्नागिरी) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या मैदानात 1 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 9 या वेळेत इलेक्‍ट्रिक मोटरवर उडणाऱ्या विविध प्रकारच्या रेडीओ कंट्रोल विमानांची प्रात्यक्षिके मुलांना विनामूल्य पाहता येणार आहेत. 


देवरूख स्नेह परिवार व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचा हा उपक्रम आहे. फ्लाईंग ईगल, ग्लायडर, उडता मासा, उडती तबकडी, ट्रेनर विमानांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे. या बरोबरच भारतीय वायुसेनेतील मिराज-3000, सुखोई-30 व राफेल या लढाऊ विमानांच्या रोमहर्षक कसरतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

अथर्व काळे  उडवणार विमाने... 

प्रसिद्घ विमान छंदिष्ट सदानंद काळे यांचा हा शो आहे. अथर्व काळे हे विमाने उडवणार आहेत, तर अक्षय काळे तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. बालाकोटला भारताने एअर स्ट्राईक करून अतिरेक्‍यांचे तळ उद्‌ध्वस्त केले. त्यात प्रमुख कामगिरी करणारे मिराज विमान, भारतीय वायुसेनेत नुकतेच दाखल झालेले राफेल व भारताच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक सुखोई- 30 हे या एरोमॉडेलिंग शोचे खास आकर्षण ठरणार आहे. या शो मधून मुलांना विमानांची कार्यप्रणाली अभ्यासता येणार आहे. यासाठी रुबीना चव्हाण, रेवा कदम, सदानंद भागवत सहकार्य करत आहेत. 

उडणाऱ्या विमानांचा संच उपलब्ध 
या शो नंतर स्वतः प्रयोग करून विमान छंद सुरू करण्यासाठी तीन आकर्षक उडणाऱ्या विमानांचा संच 500 रुपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com