मालवण पोलिस ठाणे आवारातच वृद्धाने विष घेतले आणि एकच.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Station Premises The Old Man Taken Poison In Malvan Kokan Marathi News

तालुक्‍यातील एका वाडीतील वृद्धाने ग्रामस्थांविरोधात पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती.अन्....

मालवण पोलिस ठाणे आवारातच वृद्धाने विष घेतले आणि एकच....

मालवण( सिंधुदूर्ग)  : येथील पोलिस ठाण्याच्या आवारात एका वृद्धाने विष प्राशन केल्याचा प्रकार घडला. पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे त्या वृद्धाला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात व तेथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वृद्धाने ज्या विषयावरून हा प्रकार केला, त्याची चौकशी करण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्‍यातील त्या गावातील वाडीत जाऊन माहिती घेतली असता त्या वृद्धाला कोणताही त्रास दिला जात नसून त्यांची तक्रार खोटी असल्याचा दावा वाडीतील ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा-फास्टॅग झोलने वाहनधारक गोल

तालुक्‍यातील एका वाडीतील वृद्धाने ग्रामस्थांविरोधात पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी वाडीतील ग्रामस्थ व त्या वृद्धाला चौकशीसाठी बोलाविले होते. प्रत्यक्षात तो वृद्ध काल एकटाच सकाळी पोलिस ठाण्यात आला. त्याने पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले. हा प्रकार तेथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.

हेही वाचा- टस्कराने पलटी केला पॉवर ट्रीलर

पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन
आज याप्रकरणी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावात जावून त्या वाडीतील ग्रामस्थांकडे चौकशी केली असता सर्व ग्रामस्थांनी वृद्धाने केलेली तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या वृद्धाने वर्षभरापूर्वी अशीच एक तक्रार दिली होती. गावात चौकशीअंती त्यात तथ्य नसल्याचे आढळल्याने त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला.