आचरा रामेश्‍वर समितीतर्फे मुख्यमंत्री निधीस लाखाचा धनादेश

Ajara Rameshwar Samitti One Lakh Donation To Chief Minister Fund
Ajara Rameshwar Samitti One Lakh Donation To Chief Minister Fund

आचरा ( सिंधुदुर्ग ) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांना न्यासाकडून हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत इनामदार श्री देव रामेश्‍वर देवस्थान कसबा आचरे समितीतर्फे 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्याकडून तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

यावेळी देवस्थान समितीचे सुधीर सुखटणकर, परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर आदी उपस्थित होते. तहसीलदार पाटणे यांनी सांगितले की, जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे.

या कोरोनामुळे प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींना मदत करणे गरजेचे बनले आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इनामदार श्री देव रामेश्‍वर संस्थान कसबा आचरे समितीने केलेली मदत कौतुकास्पद आहे. अशा दानशूर संस्था, व्यक्ती यांनी या मदत निधीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

देवस्थान समिती अध्यक्ष मिराशी म्हणाले, ""कोरोना महामारीमुळे राज्यावर आलेल्या आर्थिक संकटात सहकार्य करण्याच्या उद्देशाने ही मदत केली आहे.'  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com