कैदी राजेश गावकर प्रकरण ; कारागृह अधीक्षकाला नागपूर पोलिसांना घेतले ताब्यात ; मात्र सुभेदार फरार

भूषण आरोसकर
Monday, 3 August 2020

पाटील यांच्यावरील कारवाईवरून त्याच्याही मुसक्या लवकरच अवळण्यात येणार असण्याची शक्यता आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : कारागृहातील कैदी राजेश गावकर याच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल असलेला सावंतवाडी कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक योगेश पाटील यांना रविवारी २ ला दुपारी नागपूर येथून ताब्यात घेतले. येत्या दोन दिवसात पाटील यांना सावंतवाडीत आणण्यात येणार आहे. या प्रकरणातील कारागृहातील सुभेदार झिलबा पाढरमिसे हा मात्र अद्यापही फरार आहे. पाटील यांच्यावरील कारवाईवरून त्याच्याही मुसक्या लवकरच अवळण्यात येणार असण्याची शक्यता आहे.

येथील कारागृहात साधी कैद भोगत असलेला देवगड येथील राजेश गावकर याला कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह त्याचा साथीदार झिलबा पाढरपिसे याने माराहण केली होती. त्यात गावकर हा जखमी झाला होता. मात्र त्याच्यावर उपचार करण्यात आले नव्हते. सहकारी कैद्यांनी माहीती देऊनही रूग्णालयात दाखल करण्यात आले नाही. त्यातच गावकर याचा १९ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू मारहाणीत झाला नसून आजारी असल्यानेच झाला असे सांगण्यात आले होते.

हेही वाचा- कुटुंब नियोजनात यंदा `हा` जिल्हा मागे -

 कारागृहात असलेल्या सहकारी कैद्यांनी गावकर याच्या मृत्युनंतर  या प्रकरणाला वाचा फोडली होती. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे ठरवले पोलीस अधीक्षक गेडाम यांनी कणकवली पोलीस उपअधीक्षक याच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तयार केले आणि त्यांनी या प्रकरणी सखोल तपास केला होता. या प्रकरणी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने कारागृहात येऊन ज्या ठिकाणी गावकर हा मृत्यू मुखी पडला होता. त्या जागेवर इतर जागेची पाहणी केली यात गावकर याच्या शरीरावर असलेल्या जखमाचा हा तपास केल्यानंतर तसा अहवाल पोलीस अधीक्षक यांना दिला होता.

हेही वाचा- कोरोनाच्या भीतीने  स्तनपान न देणे धोकादायक -

त्यामुळेच तब्बल ४८ दिवसांनी कारागृह अधीक्षक योगेश पाटील व सुभेदार झिलबा पाढरमिसे याच्यावर गावकर याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले होते. पाटील व पाढरमिसे यांनी सुरूवातीला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तेथील जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण चार दिवसापूर्वी तेथील ही अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे या दोघांना ही अटक होणार हे निश्चित होते. सिंधुदुर्ग पोलिसांचे एक पथक पाटील व पाढरमिसे याच्या मार्गावर होते. त्यातच रविवारी दुपारी प्रमुख संशयित आरोपी असलेल्या योगेश पाटील याला नागपूर येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajesh gaonkar Murder case in sawantwadi Prison Superintendent Yogesh Patil arrested for nagpur police