तळवडेत पाठलाग करून दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

बांदा - गोव्याहून तळवडेच्या दिशेने गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणारी आलिशान मोटार पाठलाग करत राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग पथकाने पकडली; मात्र चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत 1 लाख 93 हजार 680 रुपयांच्या दारूसह 4 लाख 50 हजार किमतीची आलिशान मोटार असा एकूण 6 लाख 43 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला. ही कारवाई पथकाने होडावडा बाजारपेठ ते तळवडे बाजारादरम्यान काल रात्री बाराच्या दरम्यान केली.

चालक आपले वाहन तळवडा बाजारपेठेत सोडून पसार झाला. डिसेंबर महिन्यातील ही सातवी कारवाई आहे. जप्त केलेले वाहन सिंधुदुर्ग पासिंगचे असल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईतील गाडी मालकाचा व चालकाचा शोध घेण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.

वर्षअखेरीस तसेच ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणली जाते. याला आळा बसावा यासाठी राज्य उत्पादनच्या विभागीय उपायुक्त संगीता दरेकर व जिल्हा अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांनी करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले. या पार्श्‍वभूमीवर विभागीय पथकसुद्धा सिंधुदुर्गात गोवा सीमेवर ठाण मांडून आहे. काल (ता. 19) रात्री वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावर गस्त सुरू होती. होडावडा बाजारपेठेत संशयित वाहन (एम एच 07 क्‍यू 8483) दिसले. त्या वेळी पथकाने वाहनास थांबण्याचा इशारा केला; मात्र चालकाने वाहन न थांबवताच तळवडेच्या दिशेने वळविले. तळवडे बाजारपेठेत गाडी चालकाने तिथेच टाकून पलायन केले. या वेळी आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या दोन हजार बाटल्या असल्याचे उघड झाले. यात सुमारे महागड्या किमतीची एकूण 1 लाख 93 हजार 680 रुपयांची दारू आढळून आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने केली.

अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकात शंकर जाधव, चंद्रकांत कदम, एस. एम. तवसाळकर, जवान दीपक वायदंडे, हेमंत वस्त, रमाकांत ठाकूर, प्रसाद माळी, मानस पवार, शिवशंकर मुपडे, निनाद सुर्वे यांचा समावेश होता.

Web Title: Alcohol seized by the pursuit Talawade

टॅग्स