माणगावमध्ये जन्मली 24 बोटांची मुलगी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

अलिबाग - माणसाच्या हातापायाला एकूण 20 बोटे असतात; मात्र माणगाव तालुक्‍यातील भादाव येथील आदिती आणि अंकित भादावकर दाम्पत्याला झालेल्या मुलीला तब्बल 24 बोटे आहेत. ही सर्व बोटे सुस्थितीत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

या 24 बोटांच्या मुलीला पाहण्यासाठी सध्या रुग्णालयात गर्दी होत आहे. आदिती यांना शुक्रवारी (ता. 27) सकाळी प्रसूती कळा येऊ लागल्याने त्या माणगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्याच दिवशी दुपारी त्यांनी या मुलीला जन्म दिला. तिच्या हातापायाला प्रत्येकी सहा, अशी तब्बल 24 बोटे आहेत. मुलीच्या जन्मामुळे आई आदिती यांना आनंद झाला आहे. तिचे वजन दोन किलो 400 ग्राम आहे.

Web Title: alibag konkan news 24 fingers girl born