राज्यातील सर्व अष्टविनायक देवस्थान भाविकांना पुरविणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा

pali
pali

पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ अष्टविनायक देवस्थानच्या विश्वस्तांनी रविवार (ता.30) केला. 

या अष्टविनायक देवस्थान विश्वस्त संम्मेलनाचे अध्यक्षस्थान ऍड. धनंजय धारप यांनी भुषविले. अष्टविनायक देवस्थानच्या आठही देवस्थानमार्फत नाविण्यपुर्ण व वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. प्रत्येक देवस्थानमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती मिळावी व अन्य देवस्थानातही तशा प्रकारचे सामाजिक, सेवाभावी व लोकोपयोगी उपक्रम सुरु करावेत या उद्देशाने विश्वस्त मंडळाचे संम्मेलन भरविण्यात आले होते. 

यावेळी पाली बल्लाळेश्वर देवस्थानसह महड, लेण्याद्री, ओझर, सिध्दटेक, मोरगाव, थेऊर, रांजणगाव या आठ देवस्थानचे विश्वस्त मंडळाने आपण राबवित असलेले नाविण्यपुर्ण उपक्रम, कार्यक्रम व योजना यांची सविस्तर माहिती दिली. या आठही देवस्थानमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनां व उपक्रमांचा लाभ भाविकांसह सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे विश्वस्त मंडळाकडून यावेळी सांगण्यात आले. अष्टविनायक रस्ते जोड प्रकल्पाच्या प्रस्तावाला शासनाकडून तत्काळ मंजूरी मिळावी याकरीता अष्टविनायक देवस्थानचे विश्वस्त मंडळ शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  

यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धनंजय धारप यांनी बल्लाळेश्वर देवस्थानला सेवाक्षेत्रात आय.एस.ओ मानांकन प्राप्त झाले असल्याचे सांगितले. राज्य व देशभरातून दर्शनासाठी पालीत येणार्‍या भाविक भक्तगणांना देवस्थानमार्फत चांगल्या व दर्जेदार सेवासुविधा देण्यावर भर दिला जातो. तसेच देवस्थानमार्फत वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, लोकोपयोगी व सेवाभावी उपक्रम राबविले जात असल्याचे ऍड. धारप यांनी सांगितले.  सुशोभीत, सुंदर व मनोहरी देवस्थान निर्माण करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी ऍड. धारप यावेळी म्हणाले. 

एकूणच संयक्तिकरित्या झालेल्या अष्टविनायक देवस्थान विश्वस्तांच्या स्नेहसंम्मेलनाने देवस्थानमार्फत भविष्यात विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यासंदर्भात नवनवीन कल्पना या माध्यमातून सर्वांसमोर आल्या. 

या संम्मेलनास पाली बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धनंजय धारप, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, राहूल मराठे, सचिन साठे, लेण्याद्री देवस्थानचे शंकर तांम्हाणे, सदाशिव ताम्हाणे, प्रभाकर जाधव, भगवान हांडे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे आनंद महाराज तांबे, विनोद पोपटराव पवार, विश्राम देव, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, ओझर देवस्थानचे किसन मांडे, ज्ञानेश्वर कवडे, साहेबराव मांडे, रांजनगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर, लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट कैलास लोखंडे, संजय देसले, विजय वर्‍हाडी आदिंसह पदाधिकारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनय मराठे यांनी केले. तर आभार माधव साने यांनी मानले. 

बल्लाळेश्वर देवस्थांचे उपक्रम
यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी देवस्थानमार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. पाली बल्लाळेश्वर देवस्थानमार्फत राबविल्या जाणार्‍या धार्मिक कार्यक्रमात किर्तन, प्रवचन, प्रसाद लाडू, यज्ञ शाळा, तालुक्यातील मंदीर जिर्नोध्दार, नवरात्र उत्सव, वारकरी सांप्रदाय कार्यक्रम राबविले जातात. तसेच सुशोभीकरणात सुंदर मनोहरी बाग, कारंजे एरिएशन, नियोजीत उद्यान, श्री बल्लाळेश्वराच्या कथेचा लेजर शो, वेस्ट मनेजमेंट यात गांडुळ खत प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, ऑप्टीमम युजीलायझेशन या उपक्रमात सोलार वॉटर हिटींग, सोलार लाईट एनर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तसेच पिण्याचे पाणी, राहण्याची उत्तम व्यवस्था, रांगेत दर्शन घेण्याकरीता रेलिंग व्यवस्था, सुसज्य भव्य पार्किंग व्यवस्था, तसेच सामाजिक उपक्रमात 25 हजार ग्रंथाचे वाचनालय, व्यायाम शाळा साहित्य, स्टोअर्स, आय.एस.ओ, सेमिनार आयोजन, वैद्यकिय, पर्सनालिटी डेव्हलोपमेंट, इंन्व्हेसमेंट, तसेच निर्माल्य संचयन कलश, प्लॅस्टिक हटविण्याकरीता कापडी पिशवीची निर्मिती, सॉफ्टवेअर, ई दानपेटी, सुरक्षा (सेफ्टी) यात बंदुकधारी सुरक्षारक्षक, सी.सी.टि.व्ही कॅमेरे व्यवस्था, इमर्जन्सी अलार्म, अग्निशमक सिलेंडर, लाईटनिंग अरेस्टर, बिल्डिंगचा विमा, भुकंपापासून संरक्षण, आदी उपक्रम व सेवासुविधा देवस्थानट्रस्टमार्फत दिल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी आयुर्वेद व्यासपिठ सेवाविभाग प्रमुख शिरषकुमार पेंडसे व डॉ. मृदुला जोशी यांनी आयुर्वेद व्यासपिठ ही आयुर्वेदाच्या प्रसार व प्रचारसाठी कार्यरत असलेली संस्था सेवा, संशोधन, प्रचार व शिक्षण या चार चुतसुत्रीच्या आधारे कार्यरत असल्याचे सांगितले. याद्वारे धन्वतंरी जयंती उत्सव, विविध चर्चासत्र, परिसंवाद, शालेय विद्यार्थ्यांसाठी व जनसामान्यांसाठी व्याख्यानमाला, आरोग्यशिबीर, अभ्यासवर्ग, वनौषधी उद्यान प्रकल्प असे उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. पाली बल्लाळेश्वर देवस्थानमार्फत सेवा उपक्रमअंतर्गत बल्लाळेश्वर देवस्थान मंदीरात आयुर्वेद चिकित्सा केंद्र सुरु केले. तज्ञ वैद्य रुग्नांना विनामुल्य सेवा देत आहेत. अशा प्रकारची सेवा अष्टविनायक देवस्थानच्या इतरही मंदिरात सुरु करण्यात यावी असा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला. त्यास उपस्थित देवस्थानच्या विश्वस्तांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com