esakal | गणेश चित्रशाळांमध्ये लगबग
sakal

बोलून बातमी शोधा

sawantwadi

गणेश चित्रशाळांमध्ये लगबग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : गौरी-गणपती सण अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने श्री गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती रंगविण्यासाठी चित्रशाळांमध्ये अहोरात्र मेहनत घेतली जाते. प्रचंड महागाई आणि कोरोनाच्या सावटाखाली यंदाचा श्रींचा उत्सव येत असून, महागाईमुळे मूर्तीची किंमतही किमान ५०० रुपयांनी वाढली असल्याचे चित्रशाळांतून स्पष्ट झाले आहे.

येथील भटवाडी येथील उदय अळवणी यांच्या चित्र शाळेत भेट दिली असता ते म्हणाले, ‘‘गणेशमूर्ती रंगविण्याचे काम अहोरात्र सुरू असून शेवटचा रंगाचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. यंदा प्रचंड महागाईमुळे गणेशमूर्तींची किंमत वाढली आहे. करोनाच्या सावटामुळे गणेश मूर्तीची उंची देखील कमी झाली असून गणेशभक्तांचा आनंद मात्र कमी झालेला नाही. कोरोनाची भीती असली तरी गणेशभक्त गणेश चतुर्थी सण उत्सव साजरा करण्याच्या तयारीत लागले आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘गतवर्षीपासून कोरोनाचे सावट उत्सवावर येत आहे. तरीही श्री गणेश भक्त यांचा उत्साह तोच आहे; मात्र यंदा प्रचंड महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किंमतीत पाचशे रुपयांनी वाढ झालेली आहे. एक हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंत कमीत-कमी मूर्तीची किंमत आहे. काही भक्तांनी मुर्त्या कोविड नियमावली पाळत लहानच आकाराच्या करण्याची विनंती केली आहे. तसा त्या बनवल्या गेल्या आहेत. महागाईमुळे माती, रंग किमतीत वाढ आणि कलाकार यांच्या मानधनात वाढ झालेली आहे.

हेही वाचा: देवगड : दोन लसीचे डोस पुर्ण झालेल्यांची चाचणी केली जाणार नाही.

मूर्तिशाळांमध्ये गर्दी

गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्ती पाहण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत लोक येत आहेत. गणेशोत्सव सण गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत साजरा केला जातो आणि तो आनंद उत्सव निर्माण करणारा असतो. त्यामुळे श्रींचा सण हा आनंदातच साजरा करण्यासाठी गणेशभक्त तयारीत आहेत.

loading image
go to top