Amba Ghat heavy vehicle ban latest update
esakal
-दीपक कुवळेकर
देवरूख : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबाघाट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या भेगा आणि संवेदनशील झालेल्या भागाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली (Ratnagiri Kolhapur highway traffic update today) आहे. त्यामुळे रत्नागिरी व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दररोजची सुमारे ९०० ट्रकची वाहतूक ठप्प झाली आहे.