Mirya Nagpur Highway : दरीच्या बाजूला उंच सिमेंटच्या भिंती, डोंगरकड्याला लोखंडी कवच; मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाट आता झाला 100 टक्के सुरक्षित?

Amba Ghat road widening project : आंबा घाटातील चौपदरीकरण वेगाने सुरू असून डोंगरकड्यांवर मजबूत लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित व जलद झाला आहे.
Amba Ghat road widening latest update

Amba Ghat road widening latest update

esakal

Updated on

संगमेश्वर : मिऱ्या-नागपूर महामार्ग चौपदरीकरणातील आंबा घाट परिसरातील काम वेगाने सुरू आहे. हा घाट वळणावळणाचा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यंदा आंबा घाटात दरडी (Mirya Nagpur Highway four lane work) कोसळू नयेत, म्हणून डोंगरकड्याला मजबूत जाळ्या लावून मार्ग पूर्णतः सुरक्षित केला आहे. आंबाघाटाची एकूण लांबी १२ किलोमीटर होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com