आंबोली पर्यटन स्थळी अतिउत्साह टाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पोलिसांचे आवाहन - धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
आंबोली - आंबोलीत पर्यटन करा; पण स्वतःला सांभाळा. धोकादायक ठिकाणी जाऊन अतिउत्साहीपणा करू नका, असे आवाहन आंबोली पोलिसांनी वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना केले आहे.

पोलिसांचे आवाहन - धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
आंबोली - आंबोलीत पर्यटन करा; पण स्वतःला सांभाळा. धोकादायक ठिकाणी जाऊन अतिउत्साहीपणा करू नका, असे आवाहन आंबोली पोलिसांनी वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना केले आहे.

पोलिसांनी म्हटले की, घाटात ठिकठिकाणी उन्हाळ्यात व पावसाच्या सुरवातीलाही दगड कोसळत आहेत. दगड सुटत आहेत. यामुळे धोकादायक ठिकाणी थांबू नये. कड्यांवर चढल्यास खबरदारी घ्यावी. घसरण्याची शक्‍यता असते. धबधब्याच्या ठिकाणी टोकेरी, धारदार दगड लागून अपघात होऊ शकतात. हुल्लडबाजी करु नये, धबधब्यांवर चढू नये, घाटात  तसेच कावळेसाद, महादेवगड पाईंट येथे सेल्फी काढतांना कड्यांच्या टोकावर उभे राहू नये. मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने उभी करु नयेत, धिंगाणा घालू नये, पर्यटन स्थळांवर कचरा फेकू नये, महिलांना छेडछाड करण्याचे प्रकार केल्यास अथवा गैरवर्तन केल्यास तसेच अर्धनग्न कपड्यात फिरल्यास अथवा मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या कारवाई करण्यात येईल.  

यावेळी हवालदार विश्‍वास सावंत, सर्फराज मुजावर, गुरुदास तेली, प्रकाश कदम, गजानन देसाई, श्री. करुगोंडा आदी उपस्थित होते.

आंबोलीत पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पोलिस अधीक्षक गेडाम यांनी येथील वर्षा पर्यटनाचे स्वरुप लक्षात घेऊन अधिक बंदोबस्त ठेवण्याची  गरज आहे. येथे वारंवार अपघात होतात. धुक्‍यात अपघात होतात. घाटात वाहतूक कोंडी होते. महादेवगड, कावळेसाद पॉईंटकडे बंदोबस्त ठेवावा लागतो. पेट्रोलिंग करावे लागते. शिवाय स्थानिक पोलिस स्टेशनचे काम, समन्सचे काम, पंचनामे, मृतदेह मिळण्याच्या घटना यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविणे गरजचे आहे.

Web Title: amboli konkan news be car at amboli tourism place