एम्बायो प्लॅटीनम चोरी प्रकरणाचे धागेदोरे झवेरी बाजारापर्यंत

सुनिल पाटकर
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

महाड :  महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीप्रकरणाचे धागेदोरे महाड एमआयडीसीपासून थेट मुंबईतील झवेरी बाजारापर्यंत पोहोचले आहेत. महाड शहरामध्येही त्याचे काही धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविल्याने शहरातही खळबळ निर्णाण झाली आहे. या चोरी प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करणात आली असून सुमारे 60 लाख रूपये किमतीचे एक हजार तिनशे ग्रॅम प्लॅटीनम देखील जप्त करण्यात आले आहे. 

महाड :  महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीप्रकरणाचे धागेदोरे महाड एमआयडीसीपासून थेट मुंबईतील झवेरी बाजारापर्यंत पोहोचले आहेत. महाड शहरामध्येही त्याचे काही धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविल्याने शहरातही खळबळ निर्णाण झाली आहे. या चोरी प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करणात आली असून सुमारे 60 लाख रूपये किमतीचे एक हजार तिनशे ग्रॅम प्लॅटीनम देखील जप्त करण्यात आले आहे. 

सहाय्यक पोलिस निरिक्षक आबासाहेब पाटील या चोरी प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखीही काही बडे मासे गळाला लागण्याची शक्याता वर्तवली जात आहे. प्लॅटीनम चोरीप्रकरणी  मे 2018 मध्ये या कारखान्याचे अधिकारी विष्णु केंजळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने चौकशी सुरु केली. या कंपनीतील काही कंत्राटी कामगारांकडे त्यांना कंपनीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही अधिकची संपत्ती व मालमत्ता असल्याची माहिती मिळाली. या कारखान्याच्या व्यवस्थापनालाहि त्याची कल्पना दिली होती. या कारखान्यात वर्षाकाठी दहा ते बारा किलो प्लॅटीनम लागते. प्रत्यक्षात वर्षाकाठी हा वापर 25 ते 30 किलोपर्यंत वाढले होते. तरीही व्यवस्थापन मूग गिळून बसले होते. या कारखान्यातील कंत्राटी कामगार रविकांत कंक याला याच कारखान्यातील इफेड्रीन चोरीप्रकरणी नार्कोटीक्स विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर आबासाहेब पाटील यांनी नार्कोटीक्स विभागाकडून रविकांत कंक याची कस्टडी घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर प्लॅटीनम चोरीचा मुख्य सुत्रधार तोच असल्याची माहिती मिळाली.

कंक हा या कारखान्यातून प्लॅटीनम बाहेर काढून ते अजित जाधवकडे देत. तेथून ते टायटन कंपनीचा सिक्युरिटी ऑफीसर संजय घागकडे नंतर बागडे सिक्युरिटीचा सिक्युरिटी ऑफिसर उपेंद्र शंभूसिंग याच्याकडे जात असे. उपेंद्र शंभूसिंग हा हे प्लॅटीनम परेश मांझी या सराफाला विकायाचा. परेश मांझीकडून तीस लाख रूपयांचे सातशे ग्रॅम प्लॅटीनम जप्त करण्यात आले आहे. या रॅकेटमधील संतोषकुमार साने यालाही पोलिसांनी अटक केली आहे. रविकांत कंक हा आणखी एक रॅकेट चालवित होता. प्लॅटीनम बाहेर काढल्यानंतर ते शरद कांबळेकडे तेथून प्लॅटीनम ट्रंप केमिकल्सचा मॅनेजर अनिल केरकरकडे, केरकरकडून डोंबिवली येथील तुषार त्रिवेदीकडे जायचे आणि त्रिवेदी हे प्लॅटीनम झवेरी बाजारातील प्रदीप मोरे या सराफाला विकत असे. या सराफाकडून सहाशे ग्रॅम प्लॅटीनम ताब्यात घेण्यात आले आहे. या चोरीतून कंकने मोठ्या प्रमाणावर माया जमवली त्याच्या जमिनींची कागदपत्रेहि पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. 

या चोरी प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी बारा जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी रविकांत कंक हा नाकोर्टीक्स विभागाच्या ताब्यात आहे. महाड शहरातही अल्पावधीत श्रीमंत झालेले व या प्रकरणाशी संलग्न असणारे हे पोलिसांच्या चक्रात अडकले जाणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: Amboyo Platinum Thieves link to Zaveri bazar