अमित गायकवाड यांची सुधागड तालुका भा. रि. प. बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

अमित गवळे 
सोमवार, 18 जून 2018

रि. पा. इं. सुधागड तालुका युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रि. पा. इं. कामगार संघटनेचे सुधागड तालुका अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी रि. पा. इं. पक्ष व पदाचा राजीनामा दिला व भा. रि. प. बहुजन महासंघात प्रवेश केला आहे.

पाली (जि. रायगड) - भा. रि. प. बहुजन महासंघाच्या सुधागड तालुकाध्यक्षपदी अमित गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. भा. रि. प. बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे व जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

रि. पा. इं. सुधागड तालुका युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रि. पा. इं. कामगार संघटनेचे सुधागड तालुका अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी रि. पा. इं. पक्ष व पदाचा राजीनामा दिला व भा. रि. प. बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. सुधागड तालुक्यातील आसरे येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदिप गायकवाड, स्वप्निल गायकवाड, अमृत गायकवाड, नितीन गायकवाड, सतिष गायकवाड, गणेश शिंदे, प्रविण गायकवाड, प्रशांत जाधव, समिर जाधव, अमित जाधव आदिंसह आसरे, वाघोशी, घोटवडे गावातील तरुणांनी भा.रि.प बहुजन महासंघात जाहीर प्रवेश केला.  

आगामी काळात भा. रि. प. बहुजन महासंघ स्वबळावर राजकीय सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल असल्याचे मोरे म्हणाले. अमित गायकवाड यांनी सुधागड तालुक्यात भा. रि. प. बहुजन महासंघाचे मजबुत व बलाढ्य संघटन उभे करण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास भा. रि. प. बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, जिल्हा युवक सरचिटणीस गोपीनाथ सोनावणे, जिल्हा सचिव रमेश पवार, जिल्हा संघटक सचिन जाधव, अमोल साळुंके, नारायण जाधव, सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, सुधागड तालुका युवक अध्यक्ष रितेश देशमुख, सुधागड तालुका उपाध्यक्ष दगडू वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, जांभुळपाडा जि. प. गण अध्यक्ष प्रशांत गायकवाड, आनंद जाधव, नरेश गायकवाड आदिंसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Amit Gaikwad Appointment as a President of Bahujan Mahasangh