रत्नागिरीत आवळ्याची विक्री 80 रुपये किलो दराने 

Amla Sold At Rs 80 Per Kg In Ratnagiri
Amla Sold At Rs 80 Per Kg In Ratnagiri

चिपळूण ( रत्नागिरी ) - औषधी गुणधर्मामुळे आवळ्याच्या मागणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. घाऊक फळबाजारात आवळ्याची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो आवळ्याची 80 रुपये या दराने विक्री होत आहे. शहरातील फळविक्रेत्यांकडे आवळ्याची आवक सुरू झाली आहे. बाजारात आठवड्याला 1 टनापर्यंत आवळ्याची आवक होत आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात आवळ्याचा हंगाम सुरू होतो. डिसेंबरपर्यंत आवळ्याचा हंगाम सुरू राहतो. 

हंगामाच्या सुरवातीला आवळ्याला चांगले दर मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून आवळ्यावर प्रक्रिया करून उत्पादनांची निर्मिती करणारे उद्योग वाढले आहेत. औषधी गुणधर्मामुळे आवळ्याला वर्षभर चांगली मागणी असते. आवळा कॅण्डी, आवळा सुपारी, ज्यूस, मोरआवळा तसेच लोणच्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. थेट प्रक्रिया उद्योग करणारे आवळा जास्त घेतात. त्यामुळे बाजारात आवळा विक्रीसाठी फारसा उपलब्ध होत नाही. मात्र या वेळी आवळ्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.

आवळ्याची आवक वाढल्यानंतर दरात घट होईल. पुढील पंधरवड्यात आवळ्याची आवक वाढेल. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने फळधारणा चांगली झाली आहे. पोषक वातावरणामुळे आवळ्याची प्रतही चांगली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आवळा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती फैसल चिलवान यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com