अमोल मोरे पॅराआॅलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणार

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 21 मार्च 2018

साडवली : गतीमंद असुनही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच क्रीडाक्षेत्रात, व्यायाम प्रकारात देशविदेशात महाराष्ट्र संघासाठी उल्लेखनिय यश मिळवणारा देवरुख वरचीआळी येथील अमोल अनिल मोरे याने स्पेशल आॅलींपिक मध्ये पाॅवरलिफ्टींग प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आता तो महाराष्ट्र संघातून विदेशात होणार्‍या पॅराआॅलिंम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

साडवली : गतीमंद असुनही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच क्रीडाक्षेत्रात, व्यायाम प्रकारात देशविदेशात महाराष्ट्र संघासाठी उल्लेखनिय यश मिळवणारा देवरुख वरचीआळी येथील अमोल अनिल मोरे याने स्पेशल आॅलींपिक मध्ये पाॅवरलिफ्टींग प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आता तो महाराष्ट्र संघातून विदेशात होणार्‍या पॅराआॅलिंम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

अमोल अनिल मोरे हा गतिमंद आहे. त्याला चिपळुण येथील जिद्द संस्थेने शिक्षण दिले आहे. तर व्यायामाचे धडे चिपळुणच्याच शिर्के जिमकडून मिळाले आहेत. बावीस वर्षीय अमोल आता नॅशनल लेव्हलला होणार्‍या पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेची तयारी करत आहे. देवरुख नगरपंचायत व्यायाम शाळेचे प्रशिक्षक अमोलला बेंचप्रेस, स्काॅट, डिल्ट या तीन प्रकारात व्यायामाचे धडे देत आहेत.

अमोलने उत्तरप्रदेशमध्ये भोपाळ येथील पाॅवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवले यामुळे नॅशनलसाठी त्याचे सिलेक्शन झाले आहे. मुंबई,कोल्हापूर ,मिरजचे प्रशिक्षक अमोलसाठी मेहनत घेत आहेत. आॅल इंडीया लेव्हलला अमोलला स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. पाॅवरलिफ्टिंग, अॅथलॅटिक्स, गोळाफेक, या प्रकारात अमोलने चांगले यश मिळवलेआहे.आता पॅराआॅलिंम्पिक स्पर्धेसाठी देशाबाहेर जाण्याची संधी पुन्हा एकदा अमोलला मिळाली आहे.

अमोल मोरे याचे वडील पोलीस सेवेत देवरुख पोलीस स्थानकात सेवेत आहेत. आई अर्चना मोरे अमोलच्या प्रत्येक क्षणात सोबती बनली असुन अमोलच्या आहाराकडे त्या जातीने लक्ष घालून त्याला घडवत आहेत. अमोलने स्पेशल आॅलिंम्पिक मध्ये खेळताना सोळा राज्यातून 150 स्पर्धकातून बेंचप्रेस प्रकारात गोल्डमेडल मिळवले होते, तेव्हा चिपळुणवासियांनी त्याचा विशेष गौरव केला होता. शिर्के जिमचे ते यश होते.

देवरुखला वास्तव्यास आल्यावर अमोल देवरुख नगरपंचायत व्यायामशाळेत सराव करत असुन लवकरच होणार्‍या पॅराआॅलिंम्पिक स्पर्धेसाठी देवरुखवासियांनी अमोल मोरेला शुभेच्छा दिल्या आहेत. गतिमंद असुनही अमोलची प्रगती उत्तुंग यशाकडे झेप घेणारी ठरली आहे. अमोलची जिद्द व परीश्रम करण्याची तयारी त्याला यश मिळवून देणारच असा विश्वास पोलीस अनिल मोरे यांनी बोलून दाखवला.

Web Title: Amol more plays in Paralympic from maharashtra