सुवारेला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

रत्नागिरी ः विजयालक्ष्मी बचत ठेव योजनेतून अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयितास न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. "विजयालक्ष्मी बचत ठेव योजने‘च्या नावाखाली भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून पंचवीस ते तीस जणांची 13 लाख 84 हजारांची फसवणूक केल्याची घटना 22 ला उघड झाली. मिलिंद तानाजी सुवारे (रा. आजगावकरवाडी-जयस्तंभ) असे संशयिताचे नाव आहे. शहरातील खडपेवठार येथील मंजिरी मुकुंद कारकर यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती.

रत्नागिरी ः विजयालक्ष्मी बचत ठेव योजनेतून अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयितास न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. "विजयालक्ष्मी बचत ठेव योजने‘च्या नावाखाली भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून पंचवीस ते तीस जणांची 13 लाख 84 हजारांची फसवणूक केल्याची घटना 22 ला उघड झाली. मिलिंद तानाजी सुवारे (रा. आजगावकरवाडी-जयस्तंभ) असे संशयिताचे नाव आहे. शहरातील खडपेवठार येथील मंजिरी मुकुंद कारकर यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. आज पुन्हा संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: And two days in police custody suvara