
मत्स्य अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे उपजीविकेवर गदा आल्याचा आरोप करत मच्छीमारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
esakal
Malvan Fish Market : सिंधुदुर्गसह मालवणच्या किनारपट्टी भागात मासेमारी माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. एलईडी आणि बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. प्रशासनाची पूर्णपणे बंदी असताना आणि जिल्ह्यात एकही पर्ससीन एलईडी फिशिंग परवाना अस्तित्वात नसताना ‘माशांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. यामुळे यंदा दिवाळी चांगली जाईल,’ अशा आशेवर असलेल्या छोट्या मच्छीमारांच्या पोटावर थेट पाय ठेवल्याचा आरोप करत येथील मच्छीमारांना मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.