esakal | रत्नागिरी : प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणारे तिघे ताब्यात; हातखंब्यात कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी : प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणारे तिघे ताब्यात

रत्नागिरी : प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणारे तिघे ताब्यात

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : हत्ती किंवा सील प्राण्याच्या दाताची तस्करी करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हातखंबा येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी वनविभागाने ही संयुक्त कारवाई केली. यामध्ये वाहन आणि दात जप्त केले आहे. नेमका दात कोणाचा आहे, याची खात्री करण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली जाणार आहे.

मुहमद नुमान यासिन नाईक (वय ४१, रा. कोनाडी-उत्तर गोवा), हेमंत सुरेश कांडर (वय ३८, बावशी), राजन दयाळ पांगे (वय ५८, रा. पारवाडी, मालवण सिंधुदुर्ग) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी वनविभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यांनी संयुक्त मोहीम आखून काल (ता. ३१) रात्री ९ वाजता हातखंबा येथे सापळा रचला. रात्री संशयित गाडी आल्यानंतर त्या गाडीची झडती घेण्यात आली. तेव्हा संशयितांकडुन प्राण्याचा दात हस्तगत करण्यात आला; मात्र हा हस्तीदंत आहे की सील प्राण्याचा दात हे अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: शिरोड्याची ऐतिहासिक ओळख सांगणारी मिठागरे अडचणीत

ही कारवाई कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेंट बेन, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, रत्नागिरी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, वनसंरक्षक सचिन निलख, गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, वनक्षेत्रपाल फिरते पथक (चिपळूण) राजेंद्र पाटील, साताऱ्याचे पथकातील सचिन डोंबाळे, लांजा वनपाल दिली आरेकर, पालीचे गौतम कांबळे, सागर पताडे, संजय रणधीर, आकाश कडुक, राहुल गुंठे, राजाराम पाटील आदींनी ही कारवाई केली.

loading image
go to top