प्लास्टिक बंदीसाठी नागोठण्यातील तनिष्का आग्रही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नागोठणे - शहरातील बाजारपेठ, आठवडा बाजार, मटण- मासळी विक्रेते आदी ठिकाणी कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या होतो. त्याविरोधात तनिष्का व्यासपीठाच्या नागोठणे गटाने आवाज उठवला आहे. या गटाने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय कठोरपणे राबवण्याचे एक निवेदन नुकतेच नागोठणे ग्रामपंचायतीला दिले.

सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, सदस्य मिलिंद धात्रक, प्रकाश मोरे, सुप्रिया महाडिक, तनिष्कच्या नागोठणे गट समन्वयक राजश्री टेमकर, गटप्रमुख प्रतिभा तेरडे, सदस्या सुजाता जवके, निलोफर पानसरे, कल्पना टेमकर, सारिका चव्हाण, अनिता पवार, श्वेता चौलकर, मनीषा कडव, मारिया पानसरे, मंजुमा भारून, नागोठणे लायन्स क्‍लबचे अध्यक्ष यशवंत चित्रे, संजय काकडे, नितीन पत्की आदी या वेळी उपस्थित होते.   

तनिष्का व्यासपीठाच्या या गटाने चार वर्षांपूर्वी प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली. मात्र काही महिन्यांतच या निर्णयाला हरताळ फासण्याचे काम लहान-मोठ्या अशा सर्व व्यावसायिकांनी केले. डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्याने लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे प्रणय डोके यांनी सांगितले. ग्रामपंचायतीला निवेदन दिल्यानंतर तनिष्का सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकारी धर्मपाल शिंदे यांच्याशी आरोग्य केंद्रातील विविध असुविधा, गैरसोई व रुग्णांच्या तक्रारी याविषयी चर्चा केली.

Web Title: anishka aggressive for a ban on plastic