Ankur Wadhave : बालरंगभूमीवर तो परत येतोय! ‘अंजू उडाली भुर्र’ या धमाल बालनाट्यातून अंकुर वाढवे करणार धम्माल

‘अंजू उडाली भुर्र’ या धमाल बालनाट्यातून अंकुर परत एकदा बालरंगभूमीवर धमाल करण्यासाठी येत आहे.
ankur wadhave
ankur wadhavesakal
Updated on

पाली - 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून अंकुर वाढवे घरा-घरात पोहचला आहे. ‘अंजू उडाली भुर्र’ या धमाल बालनाट्यातून अंकुर परत एकदा बालरंगभूमीवर धमाल करण्यासाठी येत आहे. प्रेरणा थिएटर्स निर्मित ‘अंजू उडाली भुर्र’ हे नाटक १९ एप्रिल रोजी रंगभूमीवर येणार आहे.

अंकुर चित्रपट, मालिका, वेब सिरीज बरोबर व्यावसायिक रंगभूमीवर ‘सर्किट हाऊस’, ‘फर्स्टक्लास’, ‘कन्हैया’, ‘करुन गेलो गाव’ अशा दर्जेदार नाटकातून तर बालकलाकारांच्या संचात ‘गाढवाचं लग्न‘ आणि ‘निम्मा शिम्मा राक्षस’ अशा बाल नाट्यातून धमाल करत मनोरंजन करताना दिसतो.

आता परत तो अशोक पावसकर व चित्रा पावसकर यांच्या ‘प्रेरणा थिएटर्स’ या संस्थेच्या वतीने नरेंद्र बल्लाळ लिखित आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या दिग्दर्शनात ‘अंजू उडाली भुर्र’ या धमाल बालनाट्यातून परत एकदा बालरंगभूमीवर धमाल करण्यासाठी येतोय.

हेच नाटक ५५ वर्षापूर्वी रंगभूमीवर सादर झाले होते. त्यावेळी आताच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे यांनी अंजूची भूमिका केली होती. तसेच दिगंबर राणे आणि स्वतः पावसकर दांपत्य या नाटकात अभिनय करत असत. या नाटकाचे संगीत चला हवा येऊ द्या मधील संगीतकार तुषार देवल यांनी केले.

या बालनाट्य अंकुर सोबत पूर्णिमा अहिरे, गुलाब लाड, चिंतन लांबे, विजय मिरगे, प्राची रिंगे, गौरवी भोसले, प्राधीर काजरोळकर, बाबली मयेकर आणि अंजूच्या भूमिकेत नवोदित बाल अभिनेत्री स्कंदा गांधी दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com