सुधागडात सात ग्रामपंचायतीचा निवडणुक निकाल जाहीर

सुधागडात सात ग्रामपंचायतीचा निवडणुक निकाल जाहीर

पाली - सुधागड तालुक्यातील पाली, कुंभारशेत, नागशेत, उध्दर, चिखलगाव, वाघोशी, नेणवली या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी (ता.27) जाहिर झाला. तालुक्यातील सर्वात मोठ्या पाली ग्रामपंचायतीवर समता परिषद पुरस्कृत उमेदवार गणेश बालके विजयी झाले.

पाली तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात मतमोजणी घेण्यात आली. पालीच्या इतिहासात प्रथमच पाली ग्रामपंचायतीची सत्ता अपक्षांच्या हाती आली आहे. या आधी अकरा अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकिवर सर्व राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकत पाली गावाच्या सर्वांगिण व शास्वत विकासासाठी पाली नगरपंचायत होणेकरीता पुढाकार घेतला आहे.  पाली प्रभाग क्र. 5 मध्ये सदस्यासाठी बल्लाळ गोविंद पुराणिक व विजय मधुकर मराठे यांच्यात लढत झाली. बल्लाळ पुराणिक यांना 150 तर विजय मराठे यांना 252 मते मिळाली. सुधागड तालुक्यातील सात ग्रामपंचायतीपैकी नागशेत, नेणवली व चिखलगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर उध्दर, नेणवली, नागशेत ग्रामपंचायतीवर शे.का.पचा लालबावटा फडकला. तसेच वाघोशी ग्रामपंचायतीवर शे.का.प राष्ट्रवादी आघाडीची सत्ता प्रस्तापीत झाली. कुंभारशेत व चिखलगाव या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. वाघोशी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. 1 मधून अंकिता विशाल चिले 1234 मते तर संजना संजय सागळे यांना 886 मते मिळाली. वाघोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकिता चिले यांची सरपंचपदी वर्णी लागली. तसेच वाघोशी प्रभाग क्र. 1 मध्ये अमित बाळू गायकवाड यांना 292 मते तर दिपक पवार यांना 336 मते मिळाल्याने दिपक पवार ग्रा.पं. सदस्य म्हणून निवडून आले. प्रभाग  क्र. 1 मध्ये दर्शना दशरथ मांढरे यांना 360 मते तर रविना रविंद्र सागळे 261 मते मिळाली. उध्दर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मुक्ता लहू बांगरे व जयवंती तुकाराम जठार यांच्यात निवडणुक पार पडली. यामध्ये मुक्ता बांगारे यांना 639 मते तर जयवंती जठार यांना 452 मते मिळाल्याने सरपंचपदी मुक्ता बांगरे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. उध्दर ग्रामपंचायत सदस्य म्हणून दिपेश दिलीप केदारी, प्रमिला विजेयंद्र जठार, सुभद्रा मच्छिंद्र पवार, किशोर भरकु डोके, सुनिल हिरामण हिलम आदी बिनविरोध निवडून आले. कुंभारशेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिल वामन ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली. कुंभारशेत ग्रामपंचायतीत एका सदस्यपदासाठी निवडूक पार पडली. यामध्ये किशोर दिलीप खरिवले यांना 148 मते तर फुलारे संदीप लक्ष्मण यांना 130 मते मिळाली. नागशेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजू शंकर धारपवार यांची बिनविरोध निवड झाली. याबरोबरच अन्य सदस्य बाळू धाउ ढेबे, पुष्पा गणेश बेलोसे, निता भिम जाधव, एकनाथ शांताराम हळदे, नम्रता नामदेव वाडेकर, एकनाथ तुकाराम बलकावडे, सुरेखा सुरेश तिडके, आदी सदस्य बिनविरोध निवडून आले. नेणवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशा विजय धानुधरे यांची बिनविरोध निवड झाली.  

अन्य सदस्य बाळाराम काशिनाथ चव्हाण, कविता बळीराम जाधव, नेत्रा निलेश पालांडे, इकल्या विठ्ठल वाघमारे, ममता संदेश कोंडे, शांताराम भागोजी कोंडे, प्रतिज्ञा प्रकाश बेलोसे हे सदस्य बिनविरोध निवडून आले.  पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके यांचे समता परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष विक्रम परमार, विलास बालके, स्वप्निल बालके, संदेश सोनकर, महेश ठोंबरे यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com