नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ पर्सेनल मॅनेजमेंटची वार्षिक सभा

लक्ष्मण डूबे 
मंगळवार, 3 जुलै 2018

रसायनी (रायगड) : रायगड जिल्ह्यातील मानव संसाधन व औद्योगिक संबंध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ पर्सेनल मॅनेजमेंट (रायगड चॅप्टरची) वार्षिक सभा नुकतीच खारखर येथे झाली. सभेला जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील ठिकठिकाणचे सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच पुढील दोन वर्षा करिता सर्वानुमते नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. 

अध्यक्ष अविनाश सोमवंशी, उपाध्यक्ष अंबादास यादव आणि किशोर शेळके,  महासचिव  चंद्रशेखर शेंडे , सहसचिव दिलीप कदम, खजिनदार सत्य प्रताप देठा, सदस्य  एस डी पाटील, अशुंमन दुरगकर, निलेश भोळे व समीर शेख यांची सर्वानुमते निवड केली आहे. जिल्ह्यातील  पाताळगंगा, रसायनी, खोपोली, महाड, रोहा, नागोठणे, उरण, पनवेल, तळोजा आदि ठिकानचे कारखानदांर किंवा कारखान्यांचे प्रतिनिधि रायगड चँप्टरचे सदस्य आहेत. दरम्यान रायगड चँप्टरचे महासचिव चंद्रशेखर शेंडे आणि इतरांचे पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. 

Web Title: annual meeting of national institute of personal management