आगामी सण व उत्सव सर्वांनी शांतता, एकोपा व गुण्यागोविंद्याने साजरे करण्याचे आवाहन

अमित गवळे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पाली (रायगड)  : बकरी ईद, गोकुळाष्टमी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभीवर पाली पोलिस स्थानकात शनिवारी (ता.१८) सायंकाळी शांतता कमिटीची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना पाली पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी आगामी सण व उत्सव सर्वांनी शांतता, एकोपा व गुण्यागोविंद्याने साजरे करण्याचे आवाहन केले.

पाली (रायगड)  : बकरी ईद, गोकुळाष्टमी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभीवर पाली पोलिस स्थानकात शनिवारी (ता.१८) सायंकाळी शांतता कमिटीची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना पाली पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी आगामी सण व उत्सव सर्वांनी शांतता, एकोपा व गुण्यागोविंद्याने साजरे करण्याचे आवाहन केले.

सुधागडच्या इतिहासात नागरिकांनी नेहमीच सर्वधर्मसमभाव व सलोखा राखला आहे. तसेच येथे साजरे होणारे सण व उत्सव देखील मिळून मिसळून आनंदाने साजरे होतात. यापुढेही सण-उत्सवात सर्व समाजातील बंधुभाव व एकोपा वाढीस यावा यादृष्टीने सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जावेत. विकसीत तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या व समाजहितार्थ कामासाठी करा पोलीस व जनता यांनी समन्वयाने काम केल्यास विविध समस्या, तक्रारी व अडीअडचणी सोडविणे सुलभ होते असे रविंद्र शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीत सुधागडातील विज समस्येवर चर्चा झाली. सण व उत्सवात विजपुरवठा सुरळीत असावा, बाजारपेठेतील खड्डे दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच पाली बसस्थानकाची धोकादायक इमारतीकडे हि नागरिकांनी लक्ष विळविले. जनतेला भेडसाणारे प्रश्न व समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाली तहसिलदार व सबंधीत शासकीय अधिकारी व नागरीक यांच्या समवेत लवकरच बैठक आयोजीत करण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे, डॉ अपुर्व मुजुमदार, भाजपा जिल्हा सरचिटणिस सुनिल दांडेकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ग रा म्हात्रे, रि पा इं सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, संजय घोसाळकर, आलाप मेहता, रविंद्रनाथ ओव्हाळ, सुलतान बेणसेकर, राजेंद्र मेहता, वासुदेव मराठे आदिंसह नागरीक उपस्थित होते.

सुधागड तालुक्यात असे काम करेन, की बदली झाल्यावर सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल असे पो.नि.शिंदे यावेळी म्हणाले. या पदावरुन काम करतांना नागरीकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर भर देणार आहे. सातत्याने होणारी वाहतुक कोंडी, मोकाट गुरे यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे अाश्वासन पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिले.

Web Title: appeal to all to be celebrated peacefully in upcoming festivals