लंडनमध्ये निमंत्रित प्राध्यापक म्हणून सुरेश प्रभू यांची नियुक्‍ती

प्रभू यांनी आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये ऊर्जा, पर्यावरण, रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
लंडनमध्ये निमंत्रित प्राध्यापक म्हणून सुरेश प्रभू यांची नियुक्‍ती

मालवण : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभू यांच्याकडील समृद्ध आंतरराष्ट्रीय ज्ञान, विद्वता, तसेच जगभरातील अनेक प्रमुख देशांतील महनीय नेत्यांशी असलेला त्यांचा संपर्क यामुळेच प्रभू यांना निमंत्रित प्राध्यापक म्हणून आमंत्रित करण्यात आले.

प्रभू यांनी आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये ऊर्जा, पर्यावरण, रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. सध्या ते आंध्र प्रदेशमधून राज्यसभेत कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या परराष्ट्र धोरण व संबंधांची जबाबदारी ते शेर्पा या नात्याने सांभाळत आहेत. लंडनमधील एका प्रतिष्ठित विद्यापीठात निमंत्रीत प्राध्यापक म्हणून झालेली निवड ही माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट घडलीय. मला त्या ठिकाणी सातत्याने जावे लागणार आहे. आंतराष्ट्रीय व्यापार, जागतिक पर्यावरण अशा विविध वैश्‍विक विषयांच्या अनुषंगाने जगाचे सर्वंकष धोरण कसे असावे? हा या जागतिक कार्यक्रमाचा प्रमुख अजेंडा आहे, असे प्रभू यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com