अर्पिता हेबाळकरची नृत्य स्पर्धेत राज्य स्तरावर निवड 

Arpita Hebalkar selected For state level in dance competition
Arpita Hebalkar selected For state level in dance competition

रत्नागिरी - महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कला उत्सव स्पर्धा 2020 मध्ये शास्त्रीय नृत्य प्रकारात येथील नटराज कथ्थक नृत्य क्‍लासेसची शिष्या अर्पिता नीलेश हेबाळकर जिल्हास्तरावर प्रथम आली असून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. 

लोकसंगीत पारंपरिक लोकनृत्यशास्त्रीय वाद्यसंगीत पारंपरिक लोकसंगीत वाद्यवादन दृश्‍य कला-दृश्‍यकला- द्विमितीचित्र चित्र या प्रकारातही जिल्हाभरातील विद्यार्थ्यांची निवड झाली असून हे सर्व विद्यार्थी राज्य स्तरावर गेले आहेत. अर्पिता ही शिर्के हायस्कूलची विद्यार्थिनी असून नववीत शिकत आहे.

नटराज वर्गात नृत्यगुरू सोनम जाधव यांच्याकडे तिचे मध्यमा पूर्णचे शास्त्रीय शिक्षण सुरू आहे. माध्यमिक गटात अर्पिताने प्राथमिक फेरीत ठुमरी सादर केली होती. कथ्थकचा सातत्यपूर्ण रियाज हे तिच्या यशाचे गमक असल्याचे जाधव यांनी सांगितले. तिच्या यशाबद्दल प्रशालेत व नृत्य क्‍लासमध्ये तिचे अभिनंदन करण्यात आले. शास्त्रीय नृत्याची राज्यस्तरीय फेरी 15 डिसेंबरला दरम्यान पुणे येथे होणार आहे. 

अर्पितासह रुचा पाटकर (चिपळूण, लोकसंगीत), मधुरा जाधव (रत्नागिरी, पारंपरिक लोकनृत्य), शंतनू सावंत (रत्नागिरी, शास्त्रीय वाद्यसंगीत), सुजल लोहार (चिपळूण, पारंपरिक लोकसंगीत वाद्यवादन) आणि चिन्मयी प्रभुदेसाई (रत्नागिरी, दृश्‍यकला- द्विमितीचित्र) या जिल्ह्यातील अन्य विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय फेरीकरिता निवड झाली असून यांची फेरी 14 ते 16 डिसेंबरदरम्यान पुणे येथे होणार आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com