esakal | व्याजाने कर्ज  देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद ; महिलेसह दोघांना अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

arrested in fraud case sindhudurg crime case

वर्षभर फरारी असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोघांना शहर पोलिसांनी सापळा रचून ठाण्यात पकडले.

व्याजाने कर्ज  देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद ; महिलेसह दोघांना अटक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : वर्षभर फरारी असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोघांना शहर पोलिसांनी सापळा रचून ठाण्यात पकडले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. 1 टक्के व्याजाने कर्ज देण्याचे आमिष दाखवत 11 लाख 60 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील एका संशयिताला यापूर्वीच अटक केली आहे. 

विद्या राजकुमार निंबाळकर (57, रा. सेंट झेवियर्स स्ट्रीट, परेल, मुंबई) यांना अटक दाखविण्यात आली असून संशयित सुनील सहदेव या चौकशीसाठी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याप्रकरणी यापूर्वी धर्मेश महेंद्र कुंवर (27, रा. ठाणे) याला अटक केली होती. त्यांच्या विरोधात ओंकार संतोष चव्हाण (26, रा. खडपेवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. कमी व्याज दराने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ओंकार चव्हाण, निखिल सावंत आणि प्रसन्न पेडणेकर यांच्याकडून आपल्या खात्यात 11 लाख 60 हजार रुपये भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली होती. या वेळी फसवणूक करणाऱ्या महिलेसह एकूण तीन आरोपींवर 2019 साली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 

हेही वाचा- मानेवर फावड्याचा जोराचा फटका बसताच तो खाडीपात्रात कोसळला अन् गावात एकच खळबळ

संशयित ताब्यात; 11 लाख 60 हजारला चुना 

शहर पोलिसांनी 2019 साली धर्मेश कुंवर (27, रा. ठाणे) याला अटक केली होती. परंतु गुन्ह्यातील एका महिला व एका पुरुष संशयित आरोपींचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संबंधित गुन्ह्यातील महिला विद्या राजकुमार निंबाळकर ही कासार वडवली ठाणे येथे आलेल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या आदेशावरून आणि पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक ठाण्याला पाठविण्यात आले. 15 फेब्रुवारीला कासार वडवली पोलिस ठाणे येथील पोलिसांच्या मदतीने महिला आरोपी विद्या निंबाळकर हिचा शोध घेण्यात आला. 

हेही वाचा- सावधान : मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट करत फायनान्स कंपनीने शंभर महिलांना घातली टोपी

दोघांनी मिळून केले गुन्हे? 
दरम्यान, विद्या निंबाळकर हिने केलेल्या गुन्ह्यात सुनील कदम याचा सहभाग असण्याची तसेच दोघांनी मिळून अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन कदम यासदेखील चौकशीसाठी ताब्यात घेऊन रत्नागिरीत आणण्यात आले होते तर सोमवारीच या प्रकरणी विद्याला अटक करण्यात आली होती. 

20 वर्षांपासून निंबाळकर हिच्यासोबत.. 
संशयित निंबाळकर ही सिव्हर वूडस्‌ बिल्डिंग कासार वडवली येथे तिची मुलगी प्रिया कमलेश दळवी हिच्या घरी सापडली. या वेळी तिच्यासोबत तिच्या दोन मुली, जावई व सुनील सहदेव कदम हेदेखील मिळून आले. चौकशीदरम्यान सुनील कदम हे गेल्या 20 वर्षांपासून महिला आरोपी विद्या निंबाळकर हिच्यासोबत राहात असल्याचे समोर आले. घराची झडती घेतली असता, सुनील कदम यांच्याकडे दोन मोबाईल, एअरटेल कंपनीची अनेक सीम कार्डस्‌, वेगवेगळ्या बॅंकेची पासबुक्‍स, चेकबुक्‍स, डेबिट-क्रेडिट कार्डस्‌ तसेच हिशोबाची इतर आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली. याबाबत सुनील कदम यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

संपादन- अर्चना बनगे