आसोलीत साकारली तुपाची दत्तमूर्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

शिरोडा - आसोली (ता. वेंगुर्ले) येथील दत्तउपासक प. पू. हरेकृष्ण पोळजी यांनी त्यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त तुपाची दत्तमूर्ती साकारली आहे. सोबत श्री संत निंबराजाच्या खांद्यावरून श्री पांडुरंग दर्शन हा देखावा साकारण्यात आला आहे.

शिरोडा - आसोली (ता. वेंगुर्ले) येथील दत्तउपासक प. पू. हरेकृष्ण पोळजी यांनी त्यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त तुपाची दत्तमूर्ती साकारली आहे. सोबत श्री संत निंबराजाच्या खांद्यावरून श्री पांडुरंग दर्शन हा देखावा साकारण्यात आला आहे.

गणेशोत्सवानिमित्त तुपाची मूर्ती बनविणे हे प. पू. पोळजी यांचे गेल्या दोन-तीन वर्षांपासून खास वैशिष्ट्य बनून राहिले आहे. 2014 मध्ये त्यांनी तुपाची मारुतीची, तर 2015 मध्ये श्रीकृष्णाची मूर्ती बनविली होती. विशेष म्हणजे चालूवर्षी कन्यागत सोहळ्यानिमित्त दत्तस्थान श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे प. पू. पोळजी यांनी तुपाची दत्त मंदिर मूर्ती बनविली होती. ही मूर्ती या सोहळ्याचे एक आकर्षण बनली होती. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी श्री दत्तमूर्ती बनवली असून, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त महाराजांची वस्रे परिधान केल्याचे दाखविले आहे. दत्तमूर्ती करण्यास त्यांना सुमारे सत्तर किलो तूप लागले. ते त्यांनी श्री क्षेत्र नरसोबावाडीतून आणले. मूर्ती बनविताना प्रारंभी स्ट्रक्‍चर करून घेतले आणि त्यावर तुपाचा लेप चढविला गेला. पूर्ण मूर्ती तयार व्हायला दोन दिवसांचा कालावधी ल

आमचा गणपती दरवर्षी अकरा दिवसांचा असतो. त्यानंतर ही मूर्ती श्री सूर्यदेवाला अर्पण केली जाते आणि विरघळून जे द्रवरूप तूप मिळते ते वर्षभर दिवाबत्तीसाठी वापरले जाते.‘‘ गणपतीची मूर्ती आणि श्री संत निंबराजाच्या खांद्यावरून श्री पांडुरंग दर्शन हा देखावाही आकर्षक आहे. पाहण्यासाठी परिसरातून, सिंधुदुर्गातून भाविक येतात.
- प. पू. पोळजी

Web Title: Asolita played Tupa dattamurti