चाकरमान्यांना बसला फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

एटीएमचा शोध - इंटरनेटसेवा कोलमडली

कणकवली - जिल्ह्याभरात इंटरनेट सेवेचा पावसाच्या तोंडावर बोजवारा उडाल्याने आणि नोटांच्या तुटवड्यामुळे बहुसंख्य एटीएम मशीन सध्या बंद पडली आहेत. मुंबईच्या चाकरमान्यांची वाढती गर्दी आणि दोन दिवसाच्या सुट्टीमुळे; याचबरोबर धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यामुळे एटीएम यंत्रणेवर एकाच वेळी ताण आला आहे. बॅंकेच्या ग्राहकांना पैशासाठी एटीएम मशीन शोधण्याची वेळ येऊ लागली आहे. 

एटीएमचा शोध - इंटरनेटसेवा कोलमडली

कणकवली - जिल्ह्याभरात इंटरनेट सेवेचा पावसाच्या तोंडावर बोजवारा उडाल्याने आणि नोटांच्या तुटवड्यामुळे बहुसंख्य एटीएम मशीन सध्या बंद पडली आहेत. मुंबईच्या चाकरमान्यांची वाढती गर्दी आणि दोन दिवसाच्या सुट्टीमुळे; याचबरोबर धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यामुळे एटीएम यंत्रणेवर एकाच वेळी ताण आला आहे. बॅंकेच्या ग्राहकांना पैशासाठी एटीएम मशीन शोधण्याची वेळ येऊ लागली आहे. 

याचा फटका मुंबईच्या चाकरमान्यांना बसला. केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे; परंतु कॅशलेस व्यवहार हे केवळ बॅंकिंग क्षेत्रापुरते मर्यादित आहेत. खरेदीसाठी ग्राहकांना रोख रकमेशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही. त्यातच शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या पडल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तसेच किनारपट्टी भागात पर्यटकांची संख्या वाढली आहे. खारेपाटण ते बांद्यापर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी विविध बॅंकांची एटीएम आहेत. या एटीएमचा फायदा वाहनचालक आणि प्रवाशांना होत आहे. परंतु बॅंकांच्या एजन्सीमार्फत एटीएममध्ये रोकड भरलीच जात नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसात तर जिल्ह्यातील बहुतांशी एटीएम मशीन रोकड अभावी बंद होती. विशेषतः रेल्वे आणि बसस्थानक तसेच पेट्रोल पंपावरील एटीएम मशीन अधिक प्रभावी होती.

कॅशलेस व्यवहार अभावानेच
केंद्र शासनाने नोव्हेंबरमधील हजार, पाचशेच्या नोटाबंदीनंतर  कॅशलेस व्यवहारासाठी खरेदीदार आणि विक्रेत्यांना आवाहन केले होते; मात्र गेल्या सहा महिन्यात कॅशलेस व्यवहार विशेषतः किरकोळ खरेदी-विक्रीसाठी  फार अभावानेच होवू लागले आहेत. बॅंकांनी रोकड काढण्यासाठी घातलेली बंदी उठवल्यानंतर तर ग्राहकांनी कॅशलेस व्यवहाराकडे पाठ फिरविली. एटीएम मधून गरजेइतके पैसे मिळू लागले. त्यामुळे कॅशलेस व्यवहार दुर्लक्षित झाले. याचा थेट परिणाम उन्हाळी हंगामातील वाढत्या रोकड मागणीवर झाला आहे. बॅंकाकडेही मोठी रक्कम देण्यासाठी कॅश उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

पीओएस राम भरोसे 
जिल्ह्यातील कापड व्यवसाय, मेडिकल स्टोअर आणि पेट्रोल पंप वगळता इतर इतर व्यावसायिकांनी पीओएस मशीन उपलब्ध केलेले नाही. किंबहुना इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवाच राम भरोसे असल्याने विक्रेते आणि खरेदीदार यांच्यामध्ये असलेली संभ्रमावस्था गेल्या सहा महिन्यांत दूर झालेली नाही. परिणामी रोख व्यवहाराला आजही प्राधान्य दिले जात आहे. निवडक डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यात काही प्रमाणात कॅशलेस व्यवहार होत असून काही शहरी भागातील पेट्रोल पंपावर कॅशलेस व्यवहार होताना दिसत आहेत.

Web Title: atm machine close in konkan